चुलत बहिणी सोबत असलेल्या प्रेम प्रकरणातून चुलत भावाकडून भावाची हत्या; आरोपीला खंडणी विरोधी पथकाने बेड्या ठोकल्या

Spread the love

चुलत बहिणी सोबत असलेल्या प्रेम प्रकरणातून चुलत भावाकडून भावाची हत्या; आरोपीला खंडणी विरोधी पथकाने बेड्या ठोकल्या

योगेश पांडे/वार्ताहर 

पिंपरी- चिंचवड – पिंपरी- चिंचवडमध्ये चुलत बहिणी सोबत असलेल्या प्रेम प्रकरणातून चुलत भावाने भावाची हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटना प्रकरणी गौतम रामानंद यादव उर्फ राय याला खंडणी विरोधी पथकाने बेड्या ठोकल्या आहेत. गुरुवारी सचिन यादव याची गौतमने कोयत्याने वार करून हत्या केली होती. यात अल्पवयीन मुलाचा देखील सहभाग आहे. त्याला देखील पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सचिन यादवचे दीड वर्षांपासून सख्ख्या चुलत बहिणी सोबत प्रेम संबंध होते. हे त्यांच्या कुटुंबाला आवडत नव्हतं. त्यांचा या प्रेम प्रकरणाला विरोध होता. प्रेयसी चुलत बहीण ही कुटुंबाला सोडून सचिन राहत असलेल्या दिघीतील रूम पासून काही अंतरावर राहण्यास गेली होती. यावरून देखील त्यांच्या कुटुंबात रोष होता. गुरुवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास गौतम त्याच्या अल्पवयीन मित्रासह दिघीतील सचिन यादव च्या रूमवर गेला. तिथं त्यांच्यात वाद झाले आणि याच वादातून गौतमने सचिनवर कोयत्याने सपासप वार केले. घटनेत गंभीर जखमी होऊन मृत्यू झाला. घटनेनंतर गौतम आणि त्याचा अल्पवयीन मित्र फरार झाला होता. काही तासातच खंडणी विरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक देवेंद्र चव्हाण यांच्या पथकाने गौतमला काळा खडक तर अल्पवयीन मुलाला मावळ मधून ताब्यात घेतल आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon