राज कुंद्रा यांना पुन्हा समन्स तसेच अभिनेत्री गहना वशिष्ठलाही समन्स, आज चौकशीला हजर राहण्यासाठी समन्स

Spread the love

राज कुंद्रा यांना पुन्हा समन्स तसेच अभिनेत्री गहना वशिष्ठलाही समन्स, आज चौकशीला हजर राहण्यासाठी समन्स

योगेश पांडे/वार्ताहर 

मुंबई – सक्तवसुली संलनालयाने(ईडी) उद्योगपती राज कुंद्रा यांना दुसरे समन्स पाठवले असून बुधवारी चौकशीला उपस्थित राहण्यास सांगितले आहे. अश्लील चित्रपट निर्मितीप्रकरणी हा समन्स पाठवण्यात आला आहे. कुंद्रा हे अभिनेत्री शिल्पा शेट्टी यांचे पती आहे. याप्रकरणी मॉडेल व अभिनेत्री गहना वशिष्ठलाही समन्स पाठवण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. ईडीने राज कुंद्रा यांना समन्स पाठवून सोमवारी चौकशीला उपस्थित राहण्यासाठी सांगितले होते. पण ते सोमवारी चौकशीला उपस्थित राहिले नाही. यावेळी त्यांनी चौकशीला उपस्थित राहण्यासाठी वेळेची मागणी केली. ती मागणी ईडीने फेटाळली असून त्यांना दुसरा समन्स पाठवण्यात आला आहे. त्यांना बुधवारी चौकशीला उपस्थित राहण्यास सांगितले आहे. अभिनेत्री गहना वशिष्ठलाही याप्रकरणी समन्स बजावण्यात आला असून तिला ९ डिसेंबरला चौकशीला उपस्थित राहण्यास सांगितले आहे.

याप्रकरणी ईडी आठवड्याभरापूर्वी १५ ठिकाणी छापे टाकले होते. त्यात राज कुंद्रा यांच्या ठिकाणांचाही समावेश होता. त्यात वशिष्ठच्या ठिकाणांचाही समावेश आहे. याप्रकरणी मुंबई पोलिसांन मे २०२२ मध्ये अश्लील चित्रपटांच्या निर्मितीप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. त्याच्या आधारावर ईडी तपास करत आहे. अश्लील चित्रफीत निर्माण करून त्याच्या प्रसारणासाठी आरोपींंनी २०१९ मध्ये आर्म्स प्राईम मीडिया नावाने कंपनी स्थापन केली. या कंपनीच्या माध्यमातून अश्लील चित्रफीती प्रसारणासाठी तयार करण्यात आलेले हॉटशॉट्स नावाचे ऐप्लिकेशन लंडनस्थीत केनरीन कंपनीला विकले. पण या अॅप्लिकेशनबाबतची बरीच कामे कुंद्रामार्फतच चालू होती, असा आरोप आहे. या ऐप्लिकेशन निर्मितीसाठी राज कुंद्राने पैशांची गुंतवणूक केली होती. याप्रकरणी गुन्हे शाखेने आरोपपत्र दाखल केले होते. अभिनेत्री गहना वशिष्ठला मुंबई पोलिसांच्या मालमत्ता कक्षाने अटक केली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon