५१ मोबाईल चोरणाऱ्या आरोपीला ठोकल्या बेड्या, छत्रपती संभाजी नगर पोलिसांची कामगिरी

Spread the love

५१ मोबाईल चोरणाऱ्या आरोपीला ठोकल्या बेड्या, छत्रपती संभाजी नगर पोलिसांची कामगिरी

पोलीस महानगर नेटवर्क

छत्रपती संभाजी नगर– येथील परिसरात दिवसेंदिवस गुन्हेगारी वाढत चालली आहे. जगदीश रतिलाल नागोरी वय ४५ वर्ष पैठण तालुका पैठण जिल्हा छत्रपती संभाजी नगर ग्रामीण याने पोलीस स्टेशन पैठण येथे फिर्याद दिली त्यानुसार, दिनांक ५ मे, २०२४ रोजी रोजी दहा वाजता दुकान बंद करून घरी गेले असता दिनांक ६ मे, २०२४ रोजी दुकान सुरज मोबाईल शॉपी उघडण्याकरता गेले असता दुकानाची पाठीमागिल बाजूच्या भिंत फोडून रु.१०,९१,५००/- मोबाईल व मोबाईलचे ॲक्सेसरीज सामान कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरून नेले याबाबत पोलीस ठाणे पैठण येथे गुरन १७५/२०२४ कलम ४६१, ३८० भादवीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.

सदर गुन्यहयाच्या अनुषंगाने पोलीस अधीक्षक विनय कुमार राठोड, अप्पर पोलीस अधीक्षक सुनील लाजेवर, पोलीस निरीक्षक सतीश वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक पारध्, पोह. सुनील खरात, विठ्ठल डोके, गोपाळ पाटील, राहुल गायकवाड, चालक डमाळे इत्यादी सदर गुन्हा तपासकामी मालेगाव जिल्ह्या नाशिक येथे तांत्रिक विश्लेषण आधारे व गुप्त बातमीदरामार्फत मोतीबाग चौक मालेगाव येथे आर्यन पप्पू शेख वय १८ वर्ष रा. कापूरवाडी जिल्हा अहमदनगर यास ताब्यात घेतले असता व त्यास सदर गुन्ह्याबाबत विचारपूस केली असता त्याने व त्याचा साथीदार (फरार) परवेज मेहमूद सय्यद राहणार कापूरवाडी जिल्हा अहमदनगर अशांनी मिळून सदर गुन्हा केल्याची कबुली दिली व आरोपी क्रमांक १. याच्या ताब्यातून एकूण चोरी गेलेल्या मुद्देमाला पैकी रु.५,१०,०००/ रुपयांचे ५१ अँड्रॉइड मोबाईल हस्तगत करण्यात आले असून आरोपीची वैद्यकीय तपासणी करून रिपोर्टसह पुढील तपास पैठण पोलीस करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon