पालघर जिल्ह्यातील कातकरी कुटुंब वेठबिगारीतुन सुटका

Spread the love

पालघर जिल्ह्यातील कातकरी कुटुंब वेठबिगारीतुन सुटका

एका महिलेसह दोन लहान चिमुकल्यांचे अपहरण, कासा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

प्रमोद तिवारी

पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यातील निकणे गावातील डोंगराच्या कुशीत वसलेले कातकरी पाड्यातील सवरा कुटुंब सन २०१८ साला पासुन भिवंडी तालुक्यातील खारबाव गाणा येथील आदित्य पाटील व आकाश पाटील ह्या विटभटी मालका कडुन १८ हजार रुपये एडव्हान्स घेतले होते. ह्या पैशाची परत फेड करण्यासाठी सतत सात वर्षे जयेश सवरा व त्यांची पत्नी सविता सवरा दोघे विटभटीवर काम करत होते. सहा वर्षे काम करून सुध्दा १८ हजार रुपये फिटत नसल्याने यंदा कामावर जाण्यास सवरा कुटुंबाने नकार दिला. विटभटी मालका आकाश पाटील ह्यांनी फोरविलर गाडी घेऊन थेट सवराच्या घरून पत्नी सविता सवरा व दोन मुल अलिशा वय ९ वर्षे आयोश वय ६ वर्षे ह्याना बळजबरीने गाडीत घालून भिवंडी येथे विटभटीवर घेऊन गेले. ह्या संदर्भात जयेश सवरा ह्यांनी लाल बावटा पक्षाकडे दाद मागितली असता लोकशाही महिला संघटनेच्या तालुका अध्यक्ष काॅम्रेड सविता महालोडा लाल काॅम्रेड अनिशा वाघ सह शेकडो लाल बावटा पक्षाचे कार्यकर्त्यांनी कासा पोलीस ठाण्यात जाउन वेठबिगार कायदा व एट्रोसिटी ऍक्ट सह विविध कलमानुसार गुन्हा दाखल करून सुखरुप सुटका करण्यात आली आहे.

लाल बावटा पक्षाची प्रतिक्रिया

आज देशाला स्वतंत्र मुळुन ७५ वर्षे उलटली तरी सुद्धा जर वेठबिगारी सारखी प्रथा चालू असेल तर हे निंदनीय आहे. पिडीताच्या फिर्यादी नुकसान योग्य कलम दाखल झालेले नाही. ह्या गुन्याचा तपास स्वता डिवाईसपी करत असल्याने कलम वाढ करण्याची अपेक्षा आम्हाला आहे” काॅ.शेरू वाघ
भामाले पक्ष (लाल बावटा)
जिल्हा कमिटी सदस्य

लोकशाही महिला संघटनेची प्रतिक्रिया

“कातकरी महिलेचे व दोन लहान चिमुकल्यांचे अपहरण करून होऊन सुध्दा पोलिसांनी अपहरणाची कलम दाखल केलेली नाही. जर कलम वाढ झाली नाही तर संघटणा आंदोलन करेल” काॅ. सविता महालोडा ता. अध्यक्ष.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon