गोवंडीमध्ये बनावट नोटा सह एका युवकाला अटक
रवि निषाद/प्रतिनिधि
मुंबई – शिवाजी नगर गोवंडी पोलिसांनी बनावट नोटा सह एका युवकाला अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या युवकाचं नाव रामलुस जोसफ मिझ (५१) सांगण्यात येत आहे.
शिवाजी नगर पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, २७ नोव्हेंबर रोजी पोलिसांना अशी माहिती मिळाली की, शिवाजीनगरमध्ये एका युवकाकड़े काही बनावट नोटा सापडल्या. त्या नोटा तो काही ना काही करुन चलनात आणणार असल्याची बातमी मिळताच पोलिसानी ट्रैप लावला. त्यात माहिती मिळाली की, रामलुस जोसफ मिझ परवीन जनरल स्टोअरवर येणार असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी त्याला अटक केली. सदर आरोपीची अंगझड़ती घेतली असता त्याच्याकड़े ५०० रक्कमेच्या ६ नोटा आणि २०० रुपयांच्या २३ नोटा सापडल्या. यावर पोलिसांनी त्याच्या विरोधात गुन्हा रजि.नं.८५९/२०२४ कलम १८०, १८१, १८२ बीएनएस २०२३ प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे. सदर कारवाई अप्पर पोलीस आयुक्त डॉ.महेश पाटील,यांच्या आदेशाने डैशिंग पोलीस उपआयुक्त नवनाथ ढवळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस आयुक्त सोनवणे, देवनार विभाग व प्रभारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद पवार यांच्या सूचनेनुसार या गुन्ह्याचा तपास गुन्हे प्रकटीकरण अधिकारी पोलीस उपनिरीक्षक बाबू बेले व त्यांचे गुन्हे प्रकटीकरण पथक मधले पो.ह सावंत,पो.शि,गोडसे पो.शि कांबळे यांनी केली आहे.