शिवसेना नेत्याच्या भावाकडून धमक्या; तरुणाची आत्महत्या, हॅथवे साईस्टार केबलच्या मालकासह तिघांवर गुन्हा दाखल

Spread the love

शिवसेना नेत्याच्या भावाकडून धमक्या; तरुणाची आत्महत्या, हॅथवे साईस्टार केबलच्या मालकासह तिघांवर गुन्हा दाखल

योगेश पांडे/वार्ताहर 

मुंबई – सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करून तरुणाने आत्महत्या केल्याची घटना घडलीय. कामाच्या ठिकाणी मानसिक छळ आणि धमक्यांना कंटाळून जीवन संपवत असल्याचं तरुणाने म्हटलंय. मालाडमध्ये हा प्रकार घडला असून या प्रकरणी हॅथवे साईस्टार केबलचे मालक सदानंद कदम यांच्यासह परेश शेट्टी आणि दीपक विश्वकर्मा यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदानंद कदम हे शिवसेनेचे नेत रामदास कदम यांचे भाऊ आहेत. आत्महत्या केलेल्या तरुणाचं नाव चंद्रकुमार तिवारी असं आहे. तो मूळचा उत्तर प्रदेशचा असून आई आणि भावासाबोत मालाडमधील प्रतापनगर इथं रहायचा. कांदिवलीत ठाकूर व्हिलेजमधील टाटा प्ले इथं काम केल्यानमंतर चंद्रकुमार दुसऱ्या एका कंपनीत काम करत होता. पण सदानंद कदम, परेश शेट्टी आणि दीपक विश्वकर्मा यांनी इतर कुठेच काम करू देणार नाही अशी धमकी दिली होती.

चंद्रकुमार तिवारी धमकीमुळे तणावाखाली होता. तो भाऊ आणि आईला गावी घेऊन गेला. २९ ऑक्टोबरला त्यानं तब्येत बरी नसल्यानं कामावर जाणार नसल्याचं सांगितलं. दुसऱ्या दिवशी भावाने चंद्रकुमारला कॉल केला पण तो उचलला नाही. इतर ओळखीच्या लोकांना घरी जाऊन पााहण्यास सांगितले असता चंद्रकुमारने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचं उघडकीस आलं. व्हिडीओ शेअऱ करताना चंद्रकुमार तिवारीने सर्वांना थँक्स म्हणत माफीही मागितली होती. मी खूप मोठी चूक करत आहे पण गेली पाच वर्षे खूप कठीण काळ गेला. मी आणखी सहन करू शकत नाही असं म्हटलंय.आत्महत्येआधी चंद्रकुमार तिवारीने सोशल मीडियावर व्हिडीओ टाकला होता. त्याच्या मावसभावाला दिसला. त्यानंतर चंद्रकुमारच्या भावाने पोलिसात धाव घेत तिघांविरोधात तक्रार दाखल केलीय. व्हिडीओमध्ये आपण तिघांमुळे आत्महत्या करत असल्याचं म्हटलंय. मुंबईत तिघेही कुठे नोकरी मिळू देणार नाही अशी धमकी देत होते असा आरोप तरुणाने केला होता. या व्हिडीओच्या आधारे तक्रार दाखल केल्यानंतर गुन्हा नोंदवण्यात आलाय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon