रेल्वे पोलिसांनी हरवलेल्या बालकाचा शोध सहा तासात घेऊन केले पालकांच्या स्वाधीन
रवि निषाद/प्रतिनिधि
मुंबई – बांद्रा टर्मिनसवर गजरा गोविंद सलाट (२५) नावाच्या महिलेच हरवलेल्या ४ वर्षाच्या मुलाला रेल्वे पोलिसानी फक्त सहा तासात शोध घेऊन सुखरूप परत दिले आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितनुसार, १० ऑक्टोबर रोजी गजरा सलाट या रात्री १० वाजता जोरात पाऊस पड़त असल्याने त्यांची मुलगी ख़ुशी (५) व मुलगा माही (४) यांना घेऊन आसऱ्यासाठी वांद्रे रेलवे टर्मिनस फलाट क्रमांक ५ वरील बाकड्यावर येऊन बसले होते. दोन्ही मुलांना भूक लागल्याने त्यांना खाऊ आणण्यासाठी मुलांना स्टेशनवर बसवून बाहेर खाऊ आणण्यासाठी गेल्या त्यानंतर खाऊ घेऊन आल्यानंतर त्यांना त्यांचा मुलगा माही (४) हा दिसून आला नाही. त्यांनी आजूबाजूला शोध घेतला असता तो मिळून आला नाही म्हणून दिनांक ११ अक्टोबर रोजी दुपारी २ वाजता पोलीस ठाण्यात जाऊन सर्व हकीकत सांगितली. त्यावर पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक रोकडे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकाचे पोलिस हवालदार मोरे, पोलिस शिपाही शेडगे, आरकड यांनी वांद्रे रेलवे टर्मिनस येथील सर्व सीसीटीवी फुटेज तपासले तर सदरचा मुलगा हा वांद्रे रेलवे टर्मिनस प्लेटफार्म नंबर एक वरून ब्रिज वर जाताना दिसला. सदर बाबत महिला पोलिस कर्मचारी पवार यांना खार रेलवे स्टेशन येथील सीसीटीवी फुटेज तपसले असता सदर चा मुलगा खार रेलवे स्टेशन येथे फुटेज मध्ये दिसल्याची माहिती दिली. त्यावर गुन्हे प्रकटी करण पथकाचे मोरे, शेडगे आणि आरकड यांनी खार रेलवे स्टेशनवरील प्लेटफार्म व ब्रिज वर शोध घेतला असता तो ब्रिज वर मिळून आला. त्यास पोलीस ठाण्यात आणून ठाणे अंमलदार यांचे समक्ष त्या हरवलेला बालकाची आई गजरा सलाट यांच्या ताब्यात सुखरूप देण्यात आला. त्यावर तक्रारदार यांनी वांद्रे रेलवे पोलीसांचे आभार मानले आहेत. सदरची कारवाई सहाय्यक पोलिस आयुक्त किशोर महादेव शिंदे आणि प्रभारी पोलिस निरीक्षक एम.बी.रोकडे यांचा मार्गदर्शनाखाली बांद्रा रेलवे पोलिसानी केली आहे.