नाशिकच्या ब्रह्मगिरी पर्वत परिसरातून केरळचे १० मुस्लीम तरुण पोलिसांच्या ताब्यात, त्र्यंबकेश्वरमध्ये खळबळ

Spread the love

नाशिकच्या ब्रह्मगिरी पर्वत परिसरातून केरळचे १० मुस्लीम तरुण पोलिसांच्या ताब्यात, त्र्यंबकेश्वरमध्ये खळबळ

योगेश पांडे/वार्ताहर 

नाशिक – नाशिक येथील त्र्यंबकेश्वर भागातून १० मुस्लीम तरुणांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याने एकच खळबळ उडाली आहे. ब्रह्मगिरी पर्वत परिसरात मोबाईलमध्ये हे तरुण चित्रीकरण करत होते. संशयास्पद हालचाली वाटल्याने स्थानिक नागरिकांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी तरुणांना ताब्यात घेतले असून त्यांनी चौकशी केले जात आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, सोमवारी सकाळी ब्रह्मगिरी पर्वत परिसरात केरळमधील १० मुस्लीम तरुण आपल्या मोबाईलमध्ये चित्रीकरण करत असताना आढळून आले. स्थानिक नागरिकांनी त्यांना हटकण्याचा प्रयत्न केला.त्यावेळी या तरुणांनी स्थानिक नागरिकांना उडवा उडवीची उत्तरे दिली. त्यानंतर स्थानिक नागरिकांनी याबाबतची माहिती पोलिसांना दिली असता पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी या दहा तरुणांना ताब्यात घेतले आहे. त्यांना चौकशीसाठी त्र्यंबकेश्वरच्या पोलीस ठाण्यात नेण्यात आले आहे. त्यांच्याकडे असलेल्या कागदपत्रांची आणि मोबाईलची तपासणी केली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon