गहाण ठेवलेल्या इनोव्हा कारचा परस्पर अपहार, गुन्हा दाखल
पोलीस महानगर नेटवर्क
नाशिक – नाशकात फसवणूकीचे प्रकार वाढत चालले आहेत. अशीच घटना नाशिक शहरात घडली आहे. गहाण ठेवलेल्या इनोव्हा कारचा एकाने परस्पर अपहार केल्याचा प्रकार समोर आला आहे. सावकारीतून हा प्रकार घडल्याचे बोलले जात असून याप्रकरणी मुंबईनाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार फिरोज शेख (रा.भारतनगर) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. याबाबत नजमा हमीद शेख (रा.पंचशिलनगर गंजमाळ) यांनी फिर्याद दिली आहे. शेख यांचा मुलगा दानिश हमीद शेख याने जितेश तुपलोंढे यांच्याकडून भाडेतत्वावर टोयोटा कार एमएच ०४ इके २२२१ कराराने घेतली होती. गेल्या मे महिन्यात आर्थिक अडचण असल्याने त्यांनी ती फिरोज शेख या संशयिताकडे १ लाख ३० हजारात तारण गहाण ठेवली असता ही घटना घडली. संशयित शेथ याने सदर वाहनाचा परस्पर अपहार केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. अधिक तपास हवालदार म्हैसधुणे करीत आहेत