पुण्यातील हत्येचं कनेक्शन कल्याण, मानपाडा पोलिसांनी दोघांना ठोकल्या बेड्या
पोलीस महानगर नेटवर्क
कल्याण – पुण्यातील हिंजवाडी परिसरात नर्सरीमध्ये काम करणाऱ्या एका मजुराची हत्या करणाऱ्या दोघांना डोंबिवलीतील मानपाडा पोलिसांनी कल्याण रेल्वे स्थानकातून अटक केली आहे. राजकुमार नथुनी प्रसाद सिंग आणि धीरज कुमार रमोद सिंग अशी अटक आरोपींची नावे आहेत. तर, प्रवीण महतो असे खून करण्यात आलेल्या मजुराचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी कि, पुण्यातील हिंजवाडी परिसरात नर्सरीमध्ये काम करणाऱ्या एका मजुराची दोघांनी हत्या केली होती आणि हे दोघेजण कल्याण रेल्वे स्थानकातून बिहारला पळून जाणार असल्याची माहिती सहाय्यक पोलीस आयुक्त सुनील कुराडे यांना मिळाली होती. त्याअनुषंगाने सुनील कुराडे यांनी डोंबिवलीतील मानपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कादबाने यांना याबाबत माहिती दिली असता, कादबाने यांनी तात्काळ पथक नेमून सापळा रचून दोन्ही आरोपींच्या कल्याण पूर्व रेल्वे परिसरातून मुसक्या आवळल्या आहेत. मयत प्रवीण महतो याचे अटक आरोपी राजकुमार सिंग याच्या पत्नी बरोबर अनैतिक संबंध असल्याचा संशय राजकुमारला आला असल्याने या संशयातून त्याने प्रवीण महतोची हत्या केली असल्याची माहिती समोर येत आहे.
सदरची यशस्वी कामगिरी मानपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कादबाने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राम चोपडे, प्रशांत आंधळे यांच्या पथकाने केली.