जातीवाचक शिवीगाळ व मारहाण करणाऱ्या आठ जणांवर गुन्हा दाखल, तुळजापूरमधील घटना
पोलीस महानगर नेटवर्क
सोलापूर – तुळजापूर शहरात एका महिलेला जातीवाचक शिवीगाळ करून मारहाण करण्यात आल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी आठ जणांविरुद्ध अँट्रॉसिटीसह विविध कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोनाली गोरख तुपसमिंदर (वय ३०) यांना ९ सप्टेंबर २०२४ रोजी रात्री आठ वाजता मोतीझरा स्मशानभूमीजवळ करीना शेख, पायल शेख, सना शेख, सलीम शेख, आरगाज शेख, रियाज शेख आणि राज शेख या आठ जणांनी “तू पहाटे कोणाला शिव्या देत होतीस” असे म्हणत जातीवाचक शिवीगाळ केली. त्यानंतर त्यांनी सोनाली यांना लाथाबुक्क्यांनी आणि काड्यांनी मारहाण करून जखमी केले. सोनाली यांना जिवे मारण्याची धमकीही देण्यात आली.
सोनाली तुपसमिंदर यांनी १४ सप्टेंबर रोजी तुळजापूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम १८९(२), १९१(२), १९०, ७४, ११५(२), ३५२, ३५१(३) सह अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याच्या कलम ३(१) (डब्ल्यु) (i) (ii), ३(1)(आर), ३(1) (एस) अन्वये गुन्हा नोंदवला आहे. पोलिस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.