दृश्यम चित्रपटाच्या कथेसारखे गूढ कायम ! ३० लाखांसाठी परिचारिकेचा खून; जिल्हा परिषदच्या दोन लिपिकांना अटक, सहकारयांनीच केला गेम

Spread the love

दृश्यम चित्रपटाच्या कथेसारखे गूढ कायम ! ३० लाखांसाठी परिचारिकेचा खून; जिल्हा परिषदच्या दोन लिपिकांना अटक, सहकारयांनीच केला गेम

पोलीस महानगर नेटवर्क

जळगाव – जिल्हा परिषदेच्या आरोग्य केंद्रातील निवृत्त परिचारिका स्नेहलता अनंत चुंबळे (वय ६०) यांना मिळालेली ३० लाखांची रक्कम लाटण्यासाठी जिल्हा परिषदेच्या दोन लिपिकांनी गोड बोलून सोबत नेले व कारमध्ये त्यांची हत्या केली. स्नेहलता चुंबळे एप्रिल २०२३ मध्ये साळवा नांदेड (ता. धरणगाव) येथून निवृत्त झाल्या होत्या. १७ ला स्नेहलता मुलगा समीर याच्यासह नाशिकहून जळगावला आल्या होत्या. २० ऑगस्टला रात्री अकराच्या रेल्वेने त्या नाशिकला परत येणार असल्याचे पती संजय देशमुख यांना फोन करून सांगितले होते. मात्र, त्या पोहोचल्याच नाही

मुलगा समीर, पती संजय यांनी २१ ऑगस्टला त्यांचा शोध घेतला. मात्र, माहिती मिळाली नाही. स्नेहलता यांनी नाशिकला प्लॉट घेण्यासाठी स्टेट बँकेतून ३० लाख रुपये काढले. त्यांच्यासोबत काम करणारा जिजाबराव पाटील असल्याची माहिती स्नेहलता यांची मुलगी मयुरी देशमुख हिला चांदसर येथील मामा सुनील शिंदे यांनी दिली. ही माहिती कुटुंबीयांनी दिल्याने गुन्हे शाखेने तपासाला गती दिली. गुन्हे शाखेचे सहाय्यक फौजदार विजयसिंग पाटील व कर्मचाऱ्यांनी जिजाबराव पाटील (वय ४८, रा. मुंदडानगर, अमळनेर) व विजय रंगराव निकम (वय ४६) यांना ताब्यात घेत विचारपूस केली असता, सुरवातीला दोघांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. पोलिसी खाक्या दाखविताच त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. त्यांना रात्री अकराला अटक करण्यात आली. मृत स्नेहलता यांचा मुलगा समीर यांच्या तक्रारीवरून तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon