व्हीआयपी ताफ्यामध्ये बॉडीगार्ड म्हणून घुसणाऱ्या तोतया बॉडीगार्डला खडकपाडा पोलिसांनी ठोकल्या बेड्या; १२ बोअरची बंदूक आणि ६ जिवंत काडतुसे केली जप्त 

Spread the love

व्हीआयपी ताफ्यामध्ये बॉडीगार्ड म्हणून घुसणाऱ्या तोतया बॉडीगार्डला खडकपाडा पोलिसांनी ठोकल्या बेड्या; १२ बोअरची बंदूक आणि ६ जिवंत काडतुसे केली जप्त 

योगेश पांडे / वार्ताहर 

कल्याण – कल्याणमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. कल्याणच्या खडकपाडा पोलिसांनी केलेल्या तपासामुळे मोठे कनेक्शन समोर आले आहे. व्हीआयपींच्या ताफ्यामध्ये बॉडीगार्ड म्हणून घुसणाऱ्या एकाबाबत पोलिसांना एक खबर लागली. पोलिसांनी संबंधित संतोष गोस्वामी याची चौकशी केल्यावर वेगळेत सत्य समोर आले. व्हीआयपी सुरक्षा ताफ्यात बॉडीगार्ड म्हणून जाणाऱ्या संतोष गोस्वामी याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. छत्तीसगड मध्ये राहणारा संतोष गोस्वामी याने छत्तीसगड जिल्ह्यातून बंदूक रिव्होल्वर बाळगण्याचा बनावट परवाना प्राप्त केला होता. या परवान्याच्या आधारे त्याने मुंबईतील सुरक्षा एजन्सीच्या मदतीने थेट खाजगी सुरक्षा एजन्सीशी संपर्क वाढत सुरक्षा अधिकारी म्हणून स्थान मिळवले होते. कल्याण जवळच्या आंबिवली परिसरात राहणाऱ्या या तरुणाकडे असलेला परवाना बनावट असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी त्याच्यावर नजर ठेवली असता त्याच्यावरील संशय बळावला.

छत्तीसगड येथून बंदुकीचा बनावट परवाना बनवत या परवानाच्या आधारे व्हीआयपीच्या सुरक्षा ताफ्यात सहभागी होणाऱ्या तोतयाला बॉडीगार्डला कल्याण खडकपाडा पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. संतोष गोस्वामी असे या तोतया बॉडीगार्डचे नाव असून त्याच्याकडून एक १२ बोअरची बंदूक आणि ६ जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहे. मात्र पोलिसांनी मिळालेल्या माहितीच्या आधारे तपासणी केली असता त्याचा हा बनावट परवान्यांचा कारनामा समोर आला. संतोषकडे असलेल्या परवान्याची तपासणी केली असता हा परवाना बनावट असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर खडकपाडा पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या आहेत. त्याच्याकडून एक १२ बोअरची बंदूक आणि ६ जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. या आरोपीने महत्वाच्या व्यक्तींसाठी असलेल्या “डी” सुरक्षा विभागात देखील काम केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. सध्या आरोपी पोलिसांच्या ताब्यात असून यांच्यासोबत अजून किती जण आहेत आणि कोणी कोणी असा बनावट परवाना घेतला आहे याचा तपास सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon