अल्पवयीन मुलीवर अत्याचार करुन केले गर्भवती; पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
पोलीस महानगर नेटवर्क
पुणे – अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्याशी शारिरीक संबंध ठेवल्याने त्यातून ती गर्भवती राहिल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी मुलीच्या वडिलांनी वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून त्यानुसार पोलिसांनी अवि कालिदास पोपळघट (वय २०, रा. संघर्ष चौक, वारजे माळवाडी) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची मुलगी अल्पवयीन आहे, हे माहिती असताना अवि पोपळघट याने तिला लग्नाचे आमिष दाखवून त्याच्या मित्राच्या व स्वत:च्या घरी नेऊन तिच्याशी वारंवार शारिरीक संबंध ठेवले. त्यातून ही मुलगी गर्भवती राहिली आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक शेडगे तपास करीत आहेत़.