अमली पदार्थ विरोधी संघर्ष समितीचे जिल्हाधिकारी पालघर, पोलिस अधीक्षक यांना निवेदन

Spread the love

अमली पदार्थ विरोधी संघर्ष समितीचे जिल्हाधिकारी पालघर, पोलिस अधीक्षक यांना निवेदन

संघर्ष समितीने फुंकले रणशिंग, जिल्हा अधीक्षकाचे पोलिसांना कठोर कारवाईचे आदेश

प्रमोद तिवारी

पालघर – पालघर जिल्ह्यामध्ये अमली पदार्थ विकण्याचे प्रमाण वाढले असून, स्थानिक पोलीस प्रशासन तसेच अनेक सामाजिक संघटना, पक्ष व सामाजिक कार्यकर्ते यांनी अमली पदार्थ विरोधामध्ये रणशिंग फुंकले आहे. अनेक प्रमुख नेते एकत्रित येऊन राजकीय हेवेदावे विसरून प्रभाकरजी राऊळ आणि संजयजी पाटील यांच्या नेतृत्वात अमली पदार्थ आणि अमली पदार्थ विकणाऱ्या माफीयांच्या विरोधात अमली पदार्थ विरोधी संघर्ष समिती जिल्हा पालघर गठीत करण्यात आली आहे. आतापर्यंत समितीच्या वतीने दोन महत्त्वपूर्ण बैठका झाल्या असून, तरुण पिढीला या घातक नशेपासून रोखण्यासाठी अनेक प्रकारच्या उपाय योजना , ध्येय आणि धोरण निश्चित करण्यात आले आहेत. तसेच वातावरण निर्मितीसाठी आणि जनजागृतीसाठी तालुक्यातील प्रत्येक शाळांना महाविद्यालयांना भेटी देऊन तसेच शाळा कॉलेजच्या व्यवस्थापनांना, विद्यार्थी आणि पालकांना प्रत्यक्ष भेटून जनजागृतीसाठी महारॅलीचे आयोजन करण्यात आले आहे.

आपल्या समितीने घेतलेल्या धाडसी निर्णयांचे प्रथम अभिनंदन तसेच अमली पदार्थांचा कारोबार करणाऱ्या ड्रग्स माफियांना कुठल्याही परिस्थितीत सोडले जाणार नसून कठोर कारवाई केली जाईल.तसेच अमली पदार्थ मुक्त जिल्हा करण्याचा निर्धार प्रशासनाचा असून, तसे कठोर आदेश संबंधित यंत्रणांना दिले आहेत – जिल्हाधिकारी साहेब पालघर जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये होत असलेल्या अमली पदार्थांच्या तस्करीने तरुणाई व्यसनाधीन होऊन उध्वस्त होताना दिसत आहे. शाळा व महाविद्यालयात शिक्षण घेणारे काही विद्यार्थी अमली पदार्थांच्या आहारी जात असल्याचे विधारक व भयावह चित्र सर्वत्र पहावयास मिळत आहे. आपला मुलगा व्यसनाधीन होत असल्याने पालकांना व कुटुंबीयांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत असल्याने संपूर्ण कुटुंब त्या धक्याने उध्वस्त होताना दिसून येत आहेत. परिणामी उद्याच्या देशाचे भविष्य असलेल्या तरुणाईला वाचविण्यासाठी पालघर जिल्ह्यातील विशेषतः बोईसर मधील सर्व राजकीय पक्ष, संघटना, विविध क्षेत्रातील मान्यवर एकवटले असून पालघर जिल्हा ड्रग्स मुक्त करण्याचा निर्धार करण्यात आले आहे. राष्ट्राचे भवितव्य ज्यांच्या हाती आहे ती पिढी सुदृढ व सक्षम असणे गरजेचे असल्याने या लढ्यात शैक्षणिक संस्था, एनजीओ, ग्रामपंचायत, पोलीस प्रशासन व सर्व समाज घटकांना सोबत घेऊन जनजागृती साठी रॅलीचे आयोजन करण्यात आले असून, अमली पदार्थ आणि अमली पदार्थ विकणाऱ्या माफियांच्या विरोधात तसेच अमली पदार्थांच्या आहारी जाणाऱ्या तरुण पिढीला वाचविण्यासाठीचा लढा अधिक तीव्र करण्यासाठी पालघर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी तथा पालघर जिल्हा पोलीस अधीक्षक यांना प्रत्यक्ष भेटून समितीच्या वतीने निवेदन देण्यात आले आहे.

संघर्ष समितीने रणशिंग फुंकले असून, पोलीस प्रशासनाची संपूर्ण सक्रिय सहकार्याची भूमिका असणार आहे. या अगोदरही प्रशासनाने कठोर कारवाई केलेली आहे. आणि यापुढेही कठोर कारवाई केली जाणार आहे. तरुणाई बरबाद करणाऱ्या ड्रग्स माफियांचे कंबरडे मोडल्याशिवाय पोलीस प्रशासन आता स्वस्थ बसणार नाही – पोलीस अधीक्षक पालघर जिल्हाधिकारी तथा पोलीस अधीक्षक यांना निवेदन देताना सखोल चर्चा करण्यात आली असता, अमली पदार्थाच्या नशेतून उध्वस्त होणाऱ्या तरुण पिढीला व कुटुंबीयांना वाचवण्यासाठी त्यांना आधार देण्यासाठी, बहुजन समाज रक्षणासाठी समितीने घेतलेल्या धाडसी निर्णयाचे जिल्हाधिकारी साहेब पालघर तसेच पोलीस अधीक्षक साहेब पालघर यांनी अभिनंदन तसेच कौतुक केले. तसेच कोणत्याही क्षणी कुठेही पोलीस प्रशासनाची मदत लागल्यास ती तातडीने दिली जाणार असल्याचे आश्वासन पोलीस अधीक्षक यांनी उपस्थित समितीच्या सदस्यांना दिले.

यावेळी अमली पदार्थ विरोधी संघर्ष समितीचे अध्यक्ष प्रभाकरजी राऊळ, समितीचे कार्याध्यक्ष संजयजी पाटील, समितीचे सरचिटणीस प्रशांतजी पाटील, समितीचे उपाध्यक्ष समीरजी मोरे, वरिष्ठ पत्रकार पंकजजी राऊत, समितीचे सदस्य चंद्रकांतजी जाधव, अविशजी राऊत, सचिनजी लोखंडे, अतुलजी देसाई, सुरेशजी सहानी तसेच विविध संघटनांचे सामाजिक कार्यकर्ते, विविध पक्ष संघटनांचे पदाधिकारी, एनजीओचे पदाधिकारी तसेच कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon