शेगावहून शिर्डीला जाणाऱ्या एसटी बसला अपघात; तिघांची प्रकृती गंभीर, एकूण सहा प्रवासी जखमी
योगेश पांडे / वार्ताहर
बुलढाणा – बुलढाणा जिल्ह्यातून एक अपघाताची बातमी समोर आली आहे. यात एका एसटीचा भीषण अपघात झाला आहे. शेगावहून शिर्डीला जाणाऱ्या एसटी बसला राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर हा अपघात झालाय. नांदुरा-मलकापूर दरम्यान तांदुळवाडी जवळ या बसला अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. प्रथमिक माहितीनुसार या अपघातात सहा प्रवासी जखमी झाले आहेत. तर त्यातील तिघांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती पुढे आली आहे. पावसामुळे निसरड्या झालेल्या रस्त्यावर बस घसरून पलटी झाल्याच्या प्रथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. तर अपघातातील जखमींवर सध्या खामगाव सामान्य रुग्णालयात उपचार सुरू. घटनेची माहिती मिळताच पोलिसांचे एक पथक घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास सध्या पोलीस करत आहेत.