गुटखा प्रकरणात एपीआय निलेश वाघ कंट्रोल रूमला; पोलीस दलात जोरदार चर्चा
सुरेश पाटील / प्रतिनिधी
यावल – फैजपुर पोलिसांची जप्त गुटखा परस्पर विक्रीतून ‘अवैध कमाई’ ८३ लाखाचा गुटखा ६० लाखात विक्री केल्याचे वृत्त प्रसिद्ध झाल्याबरोबर फैजपूर पोलीस स्टेशनचे एपीआय वाघ यांना जळगाव कंट्रोल रूमला जमा केल्याचे वृत्त असून ही माहिती संपूर्ण यावल रावेर तालुक्यात वाऱ्यासारखे पसरली. याबाबत फैजपूरचे डीवायएसपी तथा आयपीएस अधिकारी अन्नपूर्णासिंग यांच्याशी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधला असता त्यांचा भ्रमणध्वनी नो रिप्लाय झाल्याने अधिक माहिती मिळाली नाही. एपीआय निलेश वाघ यांना कंट्रोल रूमला जमा केले असले तरी यातील खरा सूत्रधार मात्र मोकाट राहिल्याने याबाबत सुद्धा पोलीस दलात आणि फैजपूर शहरात जोरदार चर्चा सुरू आहे. फैजपुर पोलीस स्टेशन हद्दीत सर्व प्रकारचे अवैध धंदे सर्रासपणे सुरू आहेत आणि मासिक हप्ते कोण कसे गोळा करतो त्या कलेक्शन करणाऱ्या कलेक्टर बाबत सुद्धा जोरदार चर्चा सुरू आहे.
फैजपूर पोलीस स्टेशन हद्दीत गुटखा प्रकरण न्हावी गावात आणि फैजपूर शहरात चांगलेच गाजलेले आहे तसेच गेल्या सहा महिन्यापूर्वी म्हणजे जानेवारी २०२४ मध्ये पिंपळफाटा ते अमोदा रस्त्यावर अवैध गुटख्याने भरलेल्या दोन आयशर ट्रक सोबत पेट्रोलिंग करणारी एक टाटा कंपनीची चार चाकी असा एक कोटी तीस लाखाचा मुद्देमाल पकडून जप्त केला होता या प्रकरणी गुन्हा दाखल आहे. जप चा किल्ला गुटका कोणाच्या आदेशाने नष्ट केला आहे किंवा नाही आणि प्रत्यक्षात नष्ट केल्याचे कागदपत्रे दाखवून ८३ लाखाचा गुटखा ६० लाखात विक्री केल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. याप्रकरणी सहाय्यक पोलीस निरीक्षक वाघ, हेडकॉन्स्टेबल बऱ्हाटे आणि इंगळे नामक होमगार्ड यांनी शासनाची व डीवायएसपी कार्यालयाची शुद्ध दिशाभूल करीत कागदोपत्री गुटखा नष्ट केल्याचे दाखविले. यानंतर गुटखा प्रकरणात सावदा येथील सिंधीनामक व्यक्तीला २५ लाखात गुटखा विक्री केल्याचे सुद्धा खात्रीलायक वृत्त आहे, आणि यामुळे पोलीस दलाची नाहक बदनामी झाल्याच्या कारणावरून प्रत्यक्षात गुटखा प्रकरण संबंधित हेडकॉन्स्टेबलवर कारवाई न झाल्याने तसेच भुसावळ येथील मोबाईल प्रकरणात सुद्धा त्यावेळेला संबंधित हेड कॉन्स्टेबल चे छायाचित्र एका पत्रकार फोटोग्राफरने काढल्यावर सुद्धा प्रकरण दडपण्यात आले होते याबाबत भुसावल शहरात सुद्धा जोरदार चर्चेच्या सुरू झाली आहे इत्यादी अनेक प्रकरणामुळे पोलीस दलाची प्रतिमा मलीन झाल्याने एपीआय वाघ यांना तडकाफडकी कंट्रोल रूमला जमा केल्याचे वृत्त आहे. फैजपूर पोलीस स्टेशन अंतर्गत कलेक्शन करणाऱ्यांच्या यादीत चौधरी, बऱ्हाटे हे २० ते २५ किलोमीटर किलोमीटर अंतरात बदली करून आपले आर्थिक हेतू साध्य करीत असल्याने एकाच ठिकाणी हे पाच पाच सात सात वर्ष कार्यरत कसे असा सुद्धा प्रश्न उपस्थित होत आहे.