अंडा भुर्जी विक्रेत्याने लोखंडी तवा ग्राहकाचे डोके फोडले, यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

Spread the love

अंडा भुर्जी विक्रेत्याने लोखंडी तवा ग्राहकाचे डोके फोडले, यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

सुरेश पाटील / प्रतिनिधी

यावल – यावल शहरात बोरावल गेट जवळ अंडा भुर्जी विक्रेत्याने किरकोळ कारणावरून अंडा भुर्जी घेण्यासाठी आलेल्या ग्राहकाच्या डोक्यात लोखंडी दांड्याचा तवा मारून रक्तबंभाळकरून जखमी केल्याने यावल पोलीस स्टेशनला अंडा भुर्जी विक्रेत्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सदरची घटना काल गुरुवार दि.२५ रोजी रात्री ७ : ४५ वाजता घडल्याने संपूर्ण यावल शहरात मोठी खळबळ उडाली. याबाबत सविस्तर माहिती अशी की शरद जनार्दन सपकाळे (वय ४६, रा. पिंपरी तालुका) ) यावल यांनी यावल पोस्टेला फिर्याद दिली की सुधाकर ज्ञानेश्वर सपकाळे (वय२६) हा काल दि. २५ जुलै २०२४ रोजी रात्री ७ : ३० वाजेच्या सुमारास यावल येथे बोरावल गेट जवळ पराग आमलेट सेंटर येथे अंडा भुर्जी विक्रेता पराग जगदीश चौधरी रा. सुंदर नगरी यावल यांचे दुकानावर अंडा भुर्जी घेण्यासाठी गेला असता तेथे पराग चौधरी यांच्याशी अंडा भुर्जी विकत घेण्याचे कारणावरून वादविवाद झाल्याने अंडा भुर्जी विक्रेता पराग चौधरी याने त्याचे दुकानात असलेल्या लोखंडी दांड्याच्या तव्याने सुधाकर ज्ञानेश्वर सपकाळे यांच्या डोक्यात जोराने मारहाण करून त्यास दुखापत केली.

जखमीस औषधोपचारासाठी तात्काळ यावल ग्रामीण रुग्णालयात दाखल केले जखमीच्या डोक्यातून रक्तस्त्राव मोठ्या प्रमाणात झाल्याने पुढील औषधोपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालय जळगाव येथे रवाना करण्यात आले, ही सदरची घटना गिरीश छबीलदास चौधरी राहणार यावल रेणुका देवी मंदिराजवळ याच्या समक्ष घडलेली असून फिर्याद दिल्यावरून यावल पोलीस स्टेशनला अंडा भुर्जी विक्रेता पराग जगदीश चौधरी राहणार सुंदरनगरी यावल याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला पुढील तपास यावल पोलीस करीत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon