शेअर्स खरेदीच्या नावाखाली महिलेची ४३ लाख रुपयांची ऑनलाइन फसवणूक

Spread the love

शेअर्स खरेदीच्या नावाखाली महिलेची ४३ लाख रुपयांची ऑनलाइन फसवणूक

पोलीस महानगर नेटवर्क

उल्हासनगर – राज्यात सध्या ऑनलाईन फसवणूकीने धुमाकूळ घातला आहे. पोलिसांनी वेळोवेळी जनजागृती करून देखील नागरिक मोठया प्रमाणावर जादा नफ्याच्या आमिषाला बळी पडत आहेत. अशीच एक घटना उल्हासनगर परिसरात घडली आहे. जादा नफ्याचे आमिष दाखवून बनावट शेअर्सच्या अँपवरून ४३ लाख १० हजाराचे शेअर्स खरेदी केल्याचे भासवून एका महिलेची फसवणूक केल्याचा प्रकार उघड झाला. याप्रकरणी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा रजि.नं. || ४१२/२०२४ माहिती तंत्रज्ञान अधिनियम सन २००० चे कलम ६७ (ब), ६६ (ड) प्रमाणे दाखल झाला असून पोलीस अधिक तपास करीत आहे.

उल्हासनगर कॅम्प नं- ४, येथील अंबिकानगर येथे कविता राहुल मराठे ह्या राहतात. त्यांच्या मोबाईलवर १ मे ते १० जुलै दरम्यान प्रिया, अनिल शर्मा व एचएल प्लॅटफॉर्मचा कस्टमर केअर नंबरधारक याचा फोन येऊन शेअर्स मध्ये गुंतवणूक करण्याचे व जादा नफ्याचे आमिष दाखविण्यात आले. त्यांनी एचएल प्लॅटफॉर्म ह्या बनावट शेअर्स मार्केटचे बनावट अँपवर एक लिंक देऊन त्यावर शेअर्स मध्ये गुंतवणूक करण्यास सांगण्यात आले. त्या लिंकवर मराठे यांनी तब्बल ४३ लाख १० हजार रुपयांची शेअर्स मध्ये गुंतवणूक केली. मात्र नफा मिळत नसल्याने, आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी विट्ठलवाडी पोलीस ठाणे गाठून झालेला सर्व प्रकार पोलिसांना सांगून टाकला. पोलिसांनी प्रिया, अर्जुन शर्मा व एचएल प्लॅटफॉर्म कस्टमर केअर नंबरधारका विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला. याप्रकरणी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक ए.डी. पडवळ हे अधिक तपास करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon