राज्यात बेकायदेशीरपणे शस्त्र विकणाऱ्या एका मोठ्या विक्रेऱ्यांसह तिघांना अटक; गुन्हे शाखेच्या पोलिसांना ८ पिस्तुल आणि १३८ काडतुसे जप्त करण्यात यश

Spread the love

राज्यात बेकायदेशीरपणे शस्त्र विकणाऱ्या एका मोठ्या विक्रेऱ्यांसह तिघांना अटक; गुन्हे शाखेच्या पोलिसांना ८ पिस्तुल आणि १३८ काडतुसे जप्त करण्यात यश

योगेश पांडे / वार्ताहर 

मुंबई – राज्यात बेकायदेशीरपणे आधुनिक शस्त्र विकणाऱ्या एका मोठ्या विक्रेऱ्यांसह तिघांना अटक करण्यात गुन्हे शाखेच्या पोलिसांना यश आले. आरोपीकडून आठ पिस्तुल आणि १३८ जिवंत काडतुसे असा शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे. जुहू येथे एक व्यक्ती शस्त्र घेऊन येणार असल्याची माहिती कक्ष ९ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दया नायक यांना मिळाली. त्यांच्या सुचनेनुसार पथकाने जुहूमधील आयएमए मॉल परिसरात सापळा रचला होता. मिळालेल्या माहितीनुसार संबंधित व्यक्ती तेथे येताच पथकाने त्याच्यावर झडप घातली. त्याची झडती घेतली असता त्याच्याजवळ एक पिस्तुल आणि सात जिवंत काडतुसे सापडली. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आणि चौकशी केली असता त्याने ऐरोली येथे एका ओळखीच्या व्यक्तीच्या घरात आणखी शस्त्रे ठेवल्याची माहिती दिली. याप्रकरणी मीताईलाल गुलाब चौधरी (५३) याला अटक करण्यात आली. तसेच त्याने दिलेल्या माहितीनुसार ऐरोली येथून आणखी पाच पिस्तुले आणि १२१ जिवंत काडतुसे हस्तगत करण्यात आली.

चौधरी याने चौकशीत दावर चंद्रप्पा देवरमनी उर्फ धावल या साथीदाराचे नाव सांगितले. त्यानुसार पथकाने ऐरोली येथे वास्तव्यास असलेल्या धावललाही ताब्यात घेतले. धावलच्या परिचित ठिकाणी चौधरीने पाच पिस्तुले आणि १२१ काडतुसे लपवून ठेवली होती. दरम्यान, दोघांच्या चौकशीत घणसोली येथे राहणाऱ्या व सुरक्षा एजन्सी चालविणाऱ्या पुष्पक मढवी (३४) याचे नाव उघड झाले. चौधरी व धावलने दोन पिस्तुल, काडतुसे मढवीला विकल्याचे सांगितले. त्यानुसार मढवीला अटक केली. त्याच्याकडून एक पिस्तुल आणि पाच जिवंत काडतुसे हस्तगत करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon