ॲट्रॉसिटी कायद्याबद्दल अपप्रचार करणाऱ्या अरुण ठोंबरे यांच्या विरुद्ध कायदेशीर कारवाई करण्याची मागणी

Spread the love

ॲट्रॉसिटी कायद्याबद्दल अपप्रचार करणाऱ्या अरुण ठोंबरे यांच्या विरुद्ध कायदेशीर कारवाई करण्याची मागणी

ठाणे शहर पोलीस सह आयुक्त डॉ. ज्ञानेश्वर चव्हाण यांची भेट घेऊन तथाकथित पत्रकार व समाजकंटक यांच्यावर कारवाई करण्याचे आश्वासन

कल्याण – व्हाईस ऑफ इंडिया या संघटनेचा पदाधिकारी असणारा पत्रकार अरुण ठोंबरे यांनी संघटित कट रचून शोषित, वंचित,पिडीत रहिवाशांची फसवणूक केल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यातील आरोपींना वाचवण्यासाठी आरोपींवर खोटा ॲट्रॉसिटी गुन्हा नोंद केला असल्याची आवई उठवून पिडिताला कायदेशीर मदत व मार्गदर्शन करणारे समाजसेवक महेंद्र तथा अण्णा पंडित यांचे वर जाणीवपुर्वक खोटे व दिशाभूल वैयक्तिक आरोप करून अरुण ठोंबरे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी वॄत्तपत्रातून आणि सामाजिक माध्यमातून बदनामीकारक त्यांची सामाजिक प्रतिष्ठा मलिन करणाऱ्या बातम्या प्रसिद्ध केल्या आहेत. याबाबत अण्णा पंडित हे त्यांना कायदेशीर नोटीस देणार आहेतच परंतु महेंद्र तथा अण्णा पंडित यांनी पीडितांच्या मनात विष पेरून त्यांना हाताशी घेऊन खोटा ॲट्रॉसिटी गुन्हा नोंद केला अशी चुकीची व दिशाभूल करणारी तसेच अ‍ॅट्रॉसिटी कायद्याबद्दल गैरसमज पसरवणारी बातमी प्रसिद्ध करून समस्त बहुजन वंचित पीडित अनुसूचित जाती जमातीच्या समाजाचा रोष पत्करला आहे.

मूळ मुद्द्याला बगल देऊन अनुसूचित जाती जमातीवरील अन्यायाला प्रतिकार करण्यासाठी व त्यांच्या संरक्षणासाठीचा असलेल्या ॲट्रॉसिटी कायद्याबद्दल समस्त समाजात गैरसमज निर्माण करून देणारी बातमी प्रसिद्ध केल्याबद्दल त्यांच्यावर जन माणसाचा रोष आहे. विशिष्ट समाजाच्या आरोपींची पाठराखण करण्याच्या उद्देशाने समाजसेवक अण्णा पंडित यांचे बद्दल चुकीची व दिशाभूल करणारी बातमी देऊन ॲट्रॉसिटी कायद्याबद्दल इतर समाजाच्या मनामध्ये गैरसमज निर्माण करून देण्याचा प्रयत्न केलेला आहे. अरुण ठोंबरे व त्याच्या इतर साथीदारांनी सामाजिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केलेला आहे.

याबाबतची सविस्तर माहिती अशी की बदलापूर येथील शासकीय जमिनीवरील अधिकृत झोपडपट्टी गेल्या ४०/५० वर्षापासुन वसलेली आहे.सदर झोपडपट्टीत राहणारे बहुतांशी रहिवाशी हे गोरगरीब बहुजन शोषित पीडित व अनुसूचित जाती जमाती तील आहेत.सदर जमिनीवर फार पूर्वीपासून भुमाफियांचा डोळा होता.सदर भूमाफिया व बांधकाम व्यावसायिकांनी काही स्थानिक लोकांना हाताशी धरून संघटित कट कारस्थान करुन रहिवाशांना को-ऑपरेटिव्ह सोसायटी स्थापन करुन आपली झोपडपट्टी सुरक्षित करु असे सांगुन कोऑपरेटिव्ह सोसायटी स्थापन करण्याचा बहाणा करून त्यांच्या सह्या घेतल्या आणि त्या सहयांचा दुरुपयोग सबंधित भुमाफिया व बांधकाम व्यावसायिकांना लाभ व्हावा म्हणुन झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण, ठाणे यांच्याकडे संजयनगर झोपडपट्टीला झोपडपट्टी पुनर्वसन क्षेत्र जाहीर करण्यासाठी प्रस्ताव पाठविला. व सदर प्रस्तावाला समस्त झोपडपट्टीवासियांची मंजूरी आहे हे भासवण्यासाठी कोऑपरेटिव्ह सोसायटी स्थापन करण्याच्या बहाण्याने रहिवाशांच्या घेतलेल्या सह्या एसआरए प्रकल्प अधिका-यांना सादर करुन संजयनगर झोपडपट्टी ही पुनर्वसन क्षेत्र म्हणून मंजूर करुन घेतले.

या साठी झोपडपट्टीतील रहिवाशांना तुमच्या घराच्या क्षेत्रफळापेक्षा डबल क्षेत्रफळाचे घरे मिळणार आहेत. एकाच टॅक्स पावतीवर दोन दोन तिन तीन कुटुंब दाखवण्यात आली. आपली फसवणूक झाल्याचे रहिवाशांच्या लक्षात आल्याने त्यांनी बदलापूर पूर्व पोलीस ठाण्यात डॉ.राजेश यादव,बिल्डर प्रफुल्ल मोरे,संदेश पष्टे,बांधकाम व्यावसायिक नारायण पवार, यांना मदत करणारे स्थानिक कमाल शेख, राजेश घाटे,हनुमंत तुपे,धर्मेद्र गुप्ता,संगीता राम,खाजा महेबुब शेख व पुष्कर पोळ यांचे विरोधात त्यांनी जाणीवपुर्वक संघटित कट रचून अनुसूचित जमातीच्या इसमाची फसवणूक केल्याप्रकरणी बदलापूर पुर्व पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या प्रकरणात अन्याय अत्याचार निर्मुलन समितीचे प्रदेश सरचिटणीस महेंद्र उर्फ अण्णा पंडीत हे पिडीतांना कायदेशीर मदत व मार्गदर्शन करीत आहेत.

गुन्हा नोंद होण्यापूर्वी दिनांक १८ जुन सायंकाळी ६.४४.वा.पत्रकार अरुण ठोंबरे यांनी त्यांचा फोन नंबर ९३२२१०७५२१ वरुन तसेच दि.१६ जुन रोजी दुपारी १२.०३.वाजता रामेश्वर गवई यांनी त्यांचा फोन नंबर ९३२३३६५९८४ या नंबर वरुन अण्णा पंडीत यांना फोन करून पिडीतांना मदत करू नये म्हणुन अमिष दाखवण्यात आले होते.

परंतु आंबेडकरी चळवळीशी एकनिष्ठ असलेले अण्णापंडीत हे त्यांच्या अमिषाला बळी न पडल्याने आरोपींची पाठराखण करत व्हाईस ऑफ मिडीया संघटनेच्या माध्यमातून अरुण ठोंबरे हे मुळ मुद्दा सोडुन सुडभावनेतुन अण्णापंडीत यांच्याबद्दल असलेल्या द्वेषातून त्यांनी पिडीताला हाताशी धरुन, त्यांच्यामनात विष पेरून खोटा अ‍ॅट्रॉसिटी चा गुन्हा दाखल केला असा खोटा व खोडसाळ प्रचार करणारी बातमी वृत्तपत्रातून व समाजमाध्यमातुन प्रसिद्ध करुन अण्णा पंडीत यांची बदनामीकरुन त्यांची सामाजिक प्रतिष्ठा मलिन करण्याचा प्रयत्न केला आहे तसेच विशिष्ट समाजाच्या आरोपींची पाठराखण करण्यासाठीच अ‍ॅट्रॉसिटी कायद्याबद्दल अपप्रचार करुन सामाजिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे.याबद्दल अरुण ठोंबरे व त्यांच्या सहका-यांच्या विरोधात कायदेशीर कारवाईची मागणी अण्णा पंडीत यांनी त्यांच्या शिष्टमंडळासह पोलीस सह आयुक्त (गुन्हे) डॉ. ज्ञानेश्वर चव्हाण यांची भेट घेऊन केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon