बेस्ट’चा प्रवास कीमान २ रुपयांनी महागणार; आर्थिक कोंडीचा प्रवाशांना फटका
योगेश पांडे / वार्ताहर
मुंबई – येत्या काळात मुंबईकरांना आणखी एका गोष्टीमुळं काहीशा अडचणींचा सामना करावा लागू शकतो. या अडचणी आर्थिक असल्यामुळं त्या सामान्यांवरही थेच परिणाम करताना दिसणार आहेत. कारण, मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये बस सेवा पुरवणाऱ्या बेस्टकडून तिकीट दरात वाढ केली जाणार असल्याचे संकेत देण्यात आले आहेत. अर्थसहाय्य देण्यास मुंबई महानगर पालिकेनं नकार दिल्यानं ‘बेस्ट’ची आर्थिक कोंडी झाली आहे. महापालिकेनं हात झटकल्यामुळे ही आर्थिक तूट भरून काढण्यासाठी ‘बेस्ट’कडे इतर कोणताही पर्याय नसल्यामुळं येत्या काळात तिकीट दरवाढ अटळ आहे. पालिका सूत्रांच्या माहितीनुसार सध्याच्या किमान ५ रुपये भाड्यामध्ये येत्या काळात किमान २ रुपये वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.