पुण्यात पिस्टल बाळगणाऱ्या सराईत गुन्हेगाराला अटक, गुन्हे शाखेकडून पिस्टल व काडतुसे जप्
पुणे – बेकायदेशीर पिस्तूल बाळगणाऱ्या सराईत गुन्हेगाराला गुन्हे शाखेच्या युनिट तीनच्या पथकाने अटक केली आहे. त्याच्याकडून पिस्टल आणि दोन जिवंत काडतुसे जप्त केली आहे. ही कारवाई मंगळवारी (दि.१८) दुपारी सव्वा तीन वाजण्याच्या सुमारास शिवाजीनगर येथे केली. जयेश विजय लोखंडे ,(वय-२४ रा. मंगळवार पेठ, पुणे) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.
आरोपी जयेश लोखंडे पोलीस रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. त्याच्याविरुद्ध मोका, दरोडा, दरोड्याची तयारी, जबरी दुखापत, दुखापत, बेकायदेशीर जमाव जमविणे यासारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत. जयशे लोखंडे फर्ग्युसन कॉलेजच्या बंद असलेल्या गेट नंबर तीन जवळ थांबला असून त्याच्याकडे पिस्टल असल्याची माहिती सहायक पोलीस फौजदार सुनिल पवार यांना मिळाली. त्यानुसार दुपारी सव्वा तीनच्या सुमारास सापळा रचून त्याला पकडले. त्याच्याकडून पिस्टल व दोन जिवंत काडतुसे असा एकूण ४१ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. जयेश लोखंडे अलंकार पोलीस ठाण्यातील आर्म ऍक्ट व महाराष्ट्र पोलीस कायद्यांतर्गत दाखल गुन्ह्यात फरार होता.
ही कारवाई पोलीस आयुक्त अमितेश कुमार, पोलीस सह आयुक्त प्रवीण पवार, अपर पोलीस आयुक्त गुन्हे शैलेश बलकवडे, पोलीस उपायुक्त गुन्हे अमोल झेंडे, सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे १) सुनिल तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली युनिट-३ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रंगराव पवार, पोलीस अंमलदार सुनिल पवार, शरद वाकसे, पांडूरंग कामतकर, केदार आढाव, संजीव कळंबे, ज्ञानेश्वर चित्ते, साईनाथ पाटील, सतीश कत्राळे, राकेश टेकावडे, गणेश शिंदे, सोनम नेवसे यांच्या पथकाने केली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक दिगंबर चव्हाण करीत आहेत.