नाशकात ५०० रुपयांसाठी मित्रानेच केला मित्राचा धारदार शस्त्राने हल्ला; मित्राचा जाग्गीच मृत्यू
पोलीस महानगर नेटवर्क
नाशिक – पाचशे रुपयांवरून झालेल्या वादात मित्रानेच मित्राचा खून केल्याची घटना भारतनगर परिसरात बुधवारी (ता. १९) रात्री अकरा ते साडेअकराच्या सुमारास घडली. पोलिसांनी संशयितास ताब्यात घेतले आहे. परवेज शेख (२६) असे मृताचे नाव आहे. आठ दिवसांत शहरातील खुनाची तिसरी घटना आहे.
दोघांचे मोबाईल विक्री देणे घेणे या विषयावरुन वाद झाल्याने परवेजचा अंत झाला असल्याचे सांगण्यात येत आहे. यूनिट एकचे कर्मचारी अशोका मार्ग या परिसरात वास्तव्यास आहे. त्यांना परिसरात नागरिकांची गर्दी व झालेल्या घटनेचे वृत्त कळताच लगोलग आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे. मुंबई नाका पोलिस ठाण्यात इब्राहिम सय्यद याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे. परवेज आणि संशयित इब्राहिम दोघेही मित्र आहेत. संशयितास पैशांची आवश्यकता भासल्याने त्याने त्याचा मोबाईल मित्र परवेजकडे गहाण ठेवला होता. मोबाईल सोडविण्यासाठी संशयित सय्यदने परवेजची भेट घेतली. त्यावेळी त्यांच्यात पाचशे रुपयांवरून वाद उफाळून आला. त्यातून संशयिताने स्वतःच्या मित्राची हत्या केली, याप्रकरणी अधिक तपास सुरू असल्याचे पोलीस निरीक्षक मधुकर कड यांनी सांगितले.