धक्कादायक ! गाडीमध्ये अडकून श्वास गुदमरल्याने चिमुकल्यांचा मृत्यू

Spread the love

धक्कादायक ! गाडीमध्ये अडकून श्वास गुदमरल्याने चिमुकल्यांचा मृत्यू

योगेश पांडे / वार्ताहर 

मुंबई – मुंबईच्या अँटॉप हिल परिसरातून एक दुर्दैवी बातमी समोर आली आहे. अँटॉप हिल परिसरात कारमध्ये अडकून दोघा चिमुरड्यांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेने कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून गाडीमध्ये श्वास गुदमरल्याने चिमुकल्यांचा मृत्यू झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की, खेळता खेळता गाडीत अडकून दोन चिमुकल्यांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना अँटॉप हिल परिसरात घडली आहे. साजिद मोहम्मद शेख – ७ आणि मुस्कान शेख – ५ अशी मृत्यू झालेल्या चिमुकल्यांची नावे आहेत. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

साजिद शेख आणि मुस्कान हे दोघेही काल दुपारपासून बेपत्ता होते. घरच्यांनी त्यांना शोधण्याचा खूप प्रयत्न केला मात्र त्यांचा शोध लागत नव्हता. अखेर पोलिसांना कळविण्यात आले. पोलिसांनी परिसर पिंजून काढला असता रात्रीच्या सुमारास घरापासून केवळ पन्नास मीटर अंतरावर उभ्या असलेल्या एका भांगरतील वाहनात दोघ बेशुध्द अवस्थेत सापडले. मुले खेळता खेळता गाडीमध्ये बसले. गाडी लॉक झाल्यामुळे श्वास गुदमरुन त्यांचा मृत्यू झाला असावा, असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. दोन्ही मुलांचे मृतदेह सायन हॉस्पिटलमध्ये शवविच्छेदन करण्यासाठी पाठवण्यात आले आहेत. या दुर्दैवी घटनेने चिमुकल्यांच्या कुटुंबियांवर दुखःचा डोंगर कोसळला असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. याप्रकरणी अँटॉप हिल पोलीस ठाण्यात अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलीस अधिक तपास करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Right Menu Icon