खळबळजनक ! अभियंता तरुणीवर अत्याचार, जबरदस्तीने धर्म बदलून लग्न; तिघांविरोधात गुन्हा

Spread the love

खळबळजनक ! अभियंता तरुणीवर अत्याचार, जबरदस्तीने धर्म बदलून लग्न; तिघांविरोधात गुन्हा

पोलीस महानगर नेटवर्क

छत्रपती संभाजीनगर – छत्रपती संभाजीनगरमध्ये जबरदस्तीने धर्मातर करून लग्न लावल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सातारा पोलीस स्टेशनच्या हद्दीतील एका अभियंता तरुणीवर अत्याचार करून बळजबरीने तिचे धर्मांतर केले आहे. याप्रकरणी पीडित तरुणीच्या तक्रारीवरून पोलिसांनी तीन जणांवर गुन्हा दाखल केला आहे. या घटनेनं शहरात मोठी खळबळ उडाली आहे. ताहेर तय्यब पठाण, तय्यब शब्बीर पठाण, आणि आयेशा बाहेर पठाण, अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी की, ताहेर पठाण हा बांधकाम व्यावसायिक आहे. त्याने स्वतःचे नाव लपवून आणि अविवाहित असल्याचे सांगून पीडित तरुणीसोबत मैत्री केली. काही दिवसांनी पीडितेला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिच्यावर अत्याचार केले. इतकंच नाही तर, ११ फेब्रुवारी रोजी पीडितेचे बळजबरीने धर्मांतर देखील केले. आरोपीने पीडितेला तीन धर्मगुरूकडे नेऊन कपडे व केस जमा करण्यास लावले तसेच तिला बळजबरीने प्रार्थना करण्यासही भाग पाडले.

कोऱ्या बॉण्डवर खोट्या सह्या घेऊन आरोपीने पीडितेसोबत लग्न केले. यानंतर तीन जणांनी मिळून तिच्यावर वारंवार लैंगिक अत्याचार केला. त्याचबरोबर तिला मारहाण देखील केली. दरम्यान, आपली फसवणूक झाल्याचं लक्षात येताच पीडित तरुणीने पोलिसांत धाव घेतली.

याप्रकरणी सातारा पोलिसांनी तीन आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला असून घटनेचा अधिक तपास सुरू केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Right Menu Icon