मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते नूतनीकृत बालभवन इमारतीचे उद्घाटन
पोलीस महानगर नेटवर्क
मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या उपस्थितीत मुंबईत शालेय शिक्षण विभागाच्या नूतनीकृत बालभवन इमारतीचे आज उद्घाटन केले. या वेळी त्यांनी इमारतीतील विविध सुविधांची पाहणी करत विद्यार्थ्यांसाठी आधुनिक आणि सर्वसमावेशक शैक्षणिक वातावरण उभारण्यावर भर दिला.
नूतनीकरण करण्यात आलेल्या बालभवनमध्ये प्रेक्षागृह, ग्रंथालय, संगीत कक्ष, नाटक कक्ष, बहुउद्देशीय सभागृह तसेच प्रशासकीय कार्यालयाचा समावेश करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी या सुविधा उपयुक्त ठरतील, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

कार्यक्रमास मंत्री मंगलप्रभात लोढा, मंत्री दादा भुसे, आमदार दीपक केसरकर यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.