कर्जतमध्ये १३ वर्षांच्या मुलीवर तिच्याच वडिलांकडून बलात्काराचा प्रयत्न; आईच्या तक्रारीवरून आरोपी पित्याला अटक
योगेश पांडे / वार्ताहर
कर्जत – बाप अन् मुलीच्या नात्याला काळीमा फासणारी घटना मुंबईजवळ घडली आहे. मुंबईपासून काही अंतरावर असलेल्या कर्जतच्या मुद्रे भागात बापानंच आपल्या मुलीवर अत्याचार केल्याचा संतापजनक प्रकार समोर आला. मुलीवर जबरदस्ती करून तिच्यावर अत्याचार केला. मुलीला पाहून त्याने तिला घट्ट पकडलं ती ओरडू नये म्हणून तोंड दाबलं कपडे ओढले आणि त्याने तिच्यावर जबरदस्तीने अत्याचार करायला सुरुवात केली.
जीवाच्या आकांताने १३ वर्षांची मुलगी मम्मी मम्मी ओरडली. मुलीचा आवाज ऐकून आईच्या काळजात धस्स झालं. आईनं झोपेतून उठून त्या नराधम बापाला बाजूला ओढलं आणि मारहाण करायला सुरुवात करणार तोच त्याने तिथून पळ काढला. आरोपी बाप हा ४५ वर्षांचा असून त्याचं नाव रमेशसिंग परिहार असल्याची माहिती मिळाली आहे. घटनेनंतर तो दोन दिवस तो फरार झाला होता. मंगळवारी रात्री त्याला कर्जत पोलिसांनी बेड्या ठोकल्या असून त्याला बुधवारी कोर्टात हजर करण्यात आले.
मुलीवर तिच्याच वडिलांनी रात्री जबरदस्ती शारीरिक संबंध ठेवण्याचा प्रयत्न केला. त्या रात्री त्या मुलीवर कपडे काढून जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. तिने ओरडू नये म्हणून तोंड दाबलं मात्र १३ वर्षांची मुलगी आई आई ओरडत राहिली. शेजारी झापलेल्या आईला जाग आल्यानंतर तिने आरोपीला ढकलून त्याला मारहाण करण्याचा प्रयत्न केला. मात्र तो निसटला अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
आईनं मोठ्या धाडसानं मुलीला घेऊन पोलीस ठाण्यात बापाविरोधात तक्रार दिली. आईच्या तक्रारीनंतर पोलिसांच्या दोन टीम तत्काळ रवाना झाल्या. आरोपी मोबाईल वापरत नसल्यानं त्याला ट्रॅक करणं आव्हान होतं. मात्र मंगळवारी त्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. या प्रकरणी पोलिसांकडून पुढील तपास सुरू असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे.