पैशाच्या वादातून मुलावर ॲसिडसदृश्य द्रव्य फेकल्याचा आरोप; वडिलांविरुद्ध कोथरूड पोलिसांत गुन्हा

पैशाच्या वादातून मुलावर ॲसिडसदृश्य द्रव्य फेकल्याचा आरोप; वडिलांविरुद्ध कोथरूड पोलिसांत गुन्हा

योगेश पांडे / वार्ताहर

पुणे : पैशाच्या वादातून वडिलांनीच मुलाच्या अंगावर स्वच्छतेसाठी वापरले जाणारे ॲसिडसदृश्य द्रव्य फेकल्याची धक्कादायक घटना कोथरूड परिसरातील केळेवाडी येथे घडली. या घटनेत मुलाच्या चेहऱ्याला व डोळ्याला दुखापत झाली असून त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. कोथरूड पोलिसांनी या प्रकरणी वडिलांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून आरोपी फरार झाला आहे.

तुषार शाम कदम (वय ३०) असे जखमी झालेल्या युवकाचे नाव आहे. याप्रकरणी त्यांनी कोथरूड पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १४ मे रोजी तुषार हे घरी झोपले असताना पैशाच्या कारणावरून त्यांचा वडिलांशी वाद झाला. हा वाद टोकाला गेल्यानंतर वडिलांनी घरातील स्वच्छतागृह साफ करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या ॲसिडची बाटली तुषार यांच्या अंगावर फेकल्याचा आरोप आहे.

बाटलीतील द्रव्य तुषार यांच्या चेहऱ्यावर उडाल्याने त्यांच्या डोळ्याला आणि चेहऱ्याला दुखापत झाली. घटनेनंतर त्यांना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारानंतर त्यांनी पोलिसांकडे तक्रार दिली.

या प्रकरणी कोथरूड पोलिसांनी संबंधित वडिलांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून आरोपी घटनानंतर पसार झाला आहे. पोलिसांकडून त्याचा शोध सुरू असून पुढील तपास सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon