पिरंगुट घाटात इलेक्ट्रिक कारचा भीषण अपघात; काँग्रेस नेते अभय छाजेड गंभीर जखमी

पिरंगुट घाटात इलेक्ट्रिक कारचा भीषण अपघात; काँग्रेस नेते अभय छाजेड गंभीर जखमी

पोलीस महानगर नेटवर्क 

पुणे : पिरंगुट घाटात रविवारी रात्री झालेल्या भीषण अपघातात काँग्रेस नेते अभय छाजेड गंभीर जखमी झाले. भरधाव इलेक्ट्रिक कारवरील नियंत्रण सुटल्याने वाहन थेट डोंगरावर जाऊन आदळल्याची माहिती समोर आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, रविवारी रात्री सुमारे ९.२५ वाजण्याच्या सुमारास Mahindra XEV 9e या इलेक्ट्रिक कारचा पिरंगुट घाटात अपघात झाला. आदित्य निसर्ग रेसीडेंसीकडून वाहन येत असताना अचानक तांत्रिक बिघाड झाल्याने कारने वेग घेतल्याचा दावा चालकाने केला आहे.

वाहनावरील नियंत्रण सुटल्याने कार रस्ता ओलांडून थेट डोंगरावर आदळली. या भीषण धडकेत कारचे मोठे नुकसान झाले असून, गाडीत प्रवास करणारे अभय छाजेड गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

दरम्यान, अपघातातील चालक किरकोळ जखमी झाला आहे. घटनेनंतर परिसरात काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. अपघाताचे नेमके कारण आणि वाहनातील तांत्रिक बिघाडाची शक्यता याबाबत पोलिसांकडून तपास सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon