महापौर रितू तावडे यांची चाहित्या इन्फ्रा सोलुसनच्या संचालकांसोबत सदिच्छा भेट; मुंबईतील पायाभूत सुविधांवर चर्चा
रवि निषाद / मुंबई
मुंबई : शहरातील पायाभूत सुविधांशी संबंधित विविध प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी चाहित्या सोळंकी, मुख्य संचालक, चाहित्या इन्फ्रा सोलुसन प्रा. लि. यांनी मुंबईच्या महापौर रितू तावडे यांची सदिच्छा भेट घेतली.
महापौर कार्यालयात झालेल्या या भेटीत मुंबईतील पायाभूत सुविधा क्षेत्रातील सध्याच्या अडचणी, प्रकल्पांची अंमलबजावणी आणि सुधारणा उपाययोजना यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. शहरातील इन्फ्रास्ट्रक्चर विकासात खासगी क्षेत्राची भूमिका, तसेच विविध समस्यांवर व्यवहार्य तोडगे काढण्याबाबत सोळंकी यांनी आपले मत मांडले.
या वेळी महापौरांसोबत महापालिकेतील अधिकारी, कर्मचारी तसेच काही नगरसेवक-नगरसेविका उपस्थित होते. चर्चेदरम्यान शहराच्या विकासासाठी समन्वयाने काम करण्याची गरज अधोरेखित करण्यात आली.
भेटीनंतर सोळंकी यांनी महापौर व उपस्थित मान्यवरांचे आभार मानले.