नगरपालिकेतील अकाऊंटेंट एबीसीच्या जाळ्यात, १ लाख ३४ हजारांच्या लाचेची मागणी; लाचलुचपत विभागाची धडक मोहीम

नगरपालिकेतील अकाऊंटेंट एबीसीच्या जाळ्यात, १ लाख ३४ हजारांच्या लाचेची मागणी; लाचलुचपत विभागाची धडक मोहीम

योगेश पांडे / वार्ताहर 

ठाणे – राज्यात लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने भ्रष्टाचाविरोधी मोहिम जोरदारपणे हाती घेतल्याचं दिसून येत आहे. गेल्या काही महिन्यात भ्रष्टाचारी अधिकारी, कर्मचाऱ्यांना बेड्या ठोकत एसीबीने प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडवून दिलीय. आता, कुळगाव बदलापूर नगर परिषदेतील अकाउंटेंट विकास चव्हाण यांच्या विरोधात एसीबीने कारवाई करत गुन्हा दाखल केला आहे. कामांची बिल आणि सिक्युरिटी डिपॉझिट परत करण्यासाठी संबंधित कर्मचाऱ्याने सहा टक्के लाच मागितली होती. त्यानंतर, तक्रारदाराच्या तक्रारीवरुन ठाणे लाचलुचपत विभागाने धडक देत आरोपीवरुद्ध बदलापूर पूर्व पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, या प्रकरणात आणखी काही अधिकारी अडकण्याची शक्यता आहे.

बदलापूर कुळगाव बदलापूर नगरपरिषदेतील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने रस्ते कामाचे बिल आणि सुरक्षा ठेव मोकळी करण्यासाठी ६ टक्के लाचेची मागणी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल केला असून, नगरपरिषदेच्या वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे काही महिन्यांपूर्वीपर्यंत नगर परिषदेतील कंत्राटदारांकडे बिले देण्यासाठी टक्केवारीची मागणी केली जात असल्याचे आरोप होत होते. त्यानंतर संबंधित अधिकाऱ्याला कार्यमुक्तही करण्यात आले होते. या प्रकरणातील तक्रारदाराची कंपनी रस्ते बांधणीचे काम करते. त्यांना कुळगाव बदलापूर नगरपरिषदेच्या एकूण ७७ विकासकामांचे कंत्राट मिळाले असून त्यांची कामे सध्या प्रगतीपथावर आहेत. या कामांपैकी दोन देयकांची १७ लाख ४४ हजार रुपये आणि पूर्वी केलेल्या कामाची सुरक्षा अनामत रक्कम ४ लाख ९९ हजार रुपये, अशी एकूण २२ लाख ४३ हजार रुपयांची रक्कम तक्रारदाराच्या खात्यात जमा करण्यात आली होती. ही रक्कम जमा करून दिल्याच्या मोबदल्यात ६ टक्के प्रमाणे १ लाख ३४ हजार ५०० रुपयांच्या लाचेची मागण लेखाधिकारी विकास चव्हाण यांनी केली अशी तक्रार संबंधित तक्रारदारांची होती.

तक्रारदाराने या लाचेच्या मागणीविरोधात ९ डिसेंबर २०२५ रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, मुंबई यांच्याकडे लेखी तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा करण्यासाठी १० डिसेंबर २०२५ रोजी पडताळणी करण्यात आली. या पडताळणी दरम्यान, विकास चव्हाण यांनी कामाचा मोबदला म्हणून ६ टक्के रक्कमेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले, अशी माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने जाहीर करण्यात आले आहे. या पडताळणीच्या आधारे गुरूवार, ३० एप्रिल रोजी बदलापूर पूर्व पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमान्वये विकास चव्हाण यांच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon