पालघरमध्ये आढळलेल्या दोन मृतदेहाचा अखेर उलगडा; अपघातात मित्राचा मृत्यू होताच दुसऱ्यानेही गळफासघेत केली आत्महत्या

पालघरमध्ये आढळलेल्या दोन मृतदेहाचा अखेर उलगडा; अपघातात मित्राचा मृत्यू होताच दुसऱ्यानेही गळफासघेत केली आत्महत्या

योगेश पांडे / वार्ताहर 

पालघर – पालघरच्या नानिवली येथे शुक्रवारी पहाटे दोन मित्रांचा मृतदेह आढळून आला होता. अखेर या मृतदेहाचा उलगडा झाला आहे. भरधाव वेगात असलेली बाईक थेट इलेक्ट्रिक सोलर पोलनंतर झाडावर आदळली. या अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला तर जखमी झालेल्या मित्राने शेजारीच असणाऱ्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. अपघाताचा धक्कादायक प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार, लग्नसराईतून घरी परतत असताना बाईकवरील नियंत्रण सुटल्याने भरधाव बाईक इलेक्ट्रिक पोलनंतर झाडावर आदळली होती. अपघातात पंधरा वर्षीय वैभव लहांगे याचा जागीच मृत्यू झाला आहे. आपल्या मित्राचा मृत्यू झाल्याचं समजतात बाईकवरील जखमी मित्र नितीन वरठा याने देखील शेजारी असणाऱ्या झाडाला गळफास घेऊन जीवन संपवलं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon