मालाडमध्ये श्वानावर अत्याचार, रात्री उशिरा घडला प्रकार; पोलिसांनी आरोपीला घेतले ताब्यात

मालाडमध्ये श्वानावर अत्याचार, रात्री उशिरा घडला प्रकार; पोलिसांनी आरोपीला घेतले ताब्यात

योगेश पांडे / वार्ताहर 

मुंबई – श्वानावर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना मालाड पश्चिम येथील ऑर्लेम परिसरात उघडकीस आली आहे. या प्रकरणी मालाड पोलिसांनी नरेश राजाराम चांदुलकर (४५) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

डॉ.. नीलिमा वेटर्निटी क्लिनिक येथील ॲनिमल हँडलर महेश यादव यांनी या प्रकरणी तक्रार दिली आहे. २६ एप्रिलला रात्री ११:३० वाजण्याच्या सुमारास रुक्साना शेख या त्यांच्या मांजरावर उपचार करून क्लिनिकबाहेर पडल्या असताना त्यांनी यादव यांना बोलावले. त्यावेळी तेथे एक व्यक्ती क्लिनिकच्या शेजारील पदपथावरील श्वानावर अत्याचार करीत होती. संबंधित श्वान हा जवळील दूध डेअरीच्या मालकाचा असल्याचे त्यांच्या लक्षात आले.

यादव आणि शेख यांनी त्या व्यक्तीकडे विचारणा करताच ती व्यक्ती उलट ओरडू लागली. त्यामुळे क्लिनिकमधील इतर कर्मचारी बाहेर आले. दरम्यान, श्वान मालकालाही बोलावण्यात आले. त्यानंतर क्लिनिकमधील जुई कुडतरकर यांनी पोलिसांच्या १०० क्रमांकाच्या हेल्पलाइनवर माहिती देण्यात आली. मालाड पोलिसांनी घटनास्थळावरून आरोपीला ताब्यात घेतले. त्याच्यावर पुढील कारवाई पोलिस करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon