पुणे रेल्वे स्टेशनवर वंदे भारत एक्सप्रेसचा डबा रुळावरून घसरुण भीषण अपघात; सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही
योगेश पांडे / वार्ताहर
पुणे – पुणे रेल्वे स्थानकात वंदे भारत एक्सप्रेसचा भीषण अपघात झाला आहे. सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनता एक डबा रुळावर घसरला.सोमवारी संध्याकाळी झालेल्या या घटनेने मोठी खळबळ उडाली. सुदैवाने या घटनेत कोणीही गंभीर जखमी झाले नाही.
रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल हून सोलापूरला जाणारी 22225 वंदे भारत एक्सप्रेस पुणे रेल्वे स्थानकात प्रवेश करत असताना सायंकाळी सुमारे ७.३० वाजता अपघात झाला.प्लॅटफॉर्मवर येताना डायमंड क्रॉसिंगवर चौथ्या कोचचा एक ट्रॉली (चाकांचा भाग) रुळावरून घसरल्याची माहिती आहे. मुंबईहून निघालेली वंदे भारत एक्सप्रेस पुणे रेल्वे स्थानकावरील प्लॅटफॉर्म नंबर ३ वर येत असताना अपघात झाला.
ट्रेनचा १५ नंबर डबा घसरला ही डायमंड क्रॉसिंग पुणे स्टेशनच्या यार्ड रिमॉडेलिंग प्रकल्पांतर्गत अपग्रेड करण्याची योजना आधीच करण्यात आली होती.सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. रेल्वे प्रशासनाने तातडीने घटनास्थळी पोहोचून तपास सुरू केला.या घटनेमुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून रेल्वे सुरक्षेबाबत पुन्हा प्रश्न उपस्थित होत आहेत. या घटनेनंतर रेल्वेची वाहतूक काही वेळासाठी विस्कळीत झाली.