मुस्लिम तरुणाकडून दोन हिंदू सुरक्षारक्षकांना धर्म विचारत त्यांच्यावर चाकूने हल्ला; परिसरात तणावजन्य परिस्थिती

मुस्लिम तरुणाकडून दोन हिंदू सुरक्षारक्षकांना धर्म विचारत त्यांच्यावर चाकूने हल्ला; परिसरात तणावजन्य परिस्थिती

योगेश पांडे / वार्ताहर 

मीरारोड – मीरा रोड येथील नया नगरमध्ये सोमवारी एक धक्कादायक प्रकार घडला आहे. एका मुस्लिम तरुणाने दोन हिंदू सुरक्षारक्षकांना धर्म विचारत त्यांच्यावर चाकूने हल्ला केला. या हल्ल्यात दोन्ही सुरक्षारक्षक गंभीर जखमी झाले होते. या घटनेनंतर परिसर हादरून गेला आहे. या प्रकरणात जखमी झालेल्या तरुणांची ओळख समोर आली आहे.

जखमी सुरक्षारक्षकांची ओळख, सुब्रतो सेन आणि मिश्रा अशी झाली आहे. मिश्रा यांच्यावर मीरा रोड येथील वॉकहार्ट रुग्णालयात उपचार सुरु करण्यात आले आहेत, तर दुसऱ्या जखमींवरही उपचार सुरु करण्यात आल्याची माहिती समोर आली.

घटनेच्या प्राथमिक माहितीनुसार, आरोपीने दोघांनाही धर्म विचारला, नंतर तीन वेळा कलमा वाचण्यास जबरदस्ती करण्यात आली होती. त्या सुरक्षारक्षकांनी नकार दिल्यानंतर आरोपीने त्यांच्यावर चाकूने सपासप वार करत संपवले. स्थानिकांनी तात्काळ पोलिसांना या घटनेची माहिती दिला असता, घटनास्थळी पोलिसांनी धाव घेत प्रकरणाचा तपास सुरु केला.

दरम्यान, सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी आरोपीची ओळख पट‍वली आणि त्याला अटक केली. पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपी हा मीरा रोड येथील नया नगरमधील रहिवासी आहे. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेत या प्रकरणाचा पोलीस पुढील तपास करत आहेत. पोलीस संबंधित आरोपीच्या गुन्हेगारीची पार्श्वभूमी तपासली जात आहे. या घटनेनं परिसरात तणावजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon