वीज मीटर बिघाडाची भीती दाखवत गृहिणीकडून ३.१० लाखांची ऑनलाईन फसवणूक

वीज मीटर बिघाडाची भीती दाखवत गृहिणीकडून ३.१० लाखांची ऑनलाईन फसवणूक

पोलीस महानगर नेटवर्क 

कल्याण : वीज मीटरमध्ये बिघाड असल्याची भीती दाखवत आणि महावितरणच्या कारवाईपासून वाचवण्याचे आमिष देत दोन भामट्यांनी एका गृहिणीकडून तब्बल ३ लाख १० हजार रुपये उकळल्याची घटना कल्याणमध्ये उघडकीस आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपींनी संबंधित गृहिणीशी संपर्क साधून तिच्या घरातील वीज मीटरमध्ये त्रुटी असल्याचे सांगितले. तसेच तातडीने कारवाई टाळायची असल्यास काही रक्कम भरावी लागेल, असे भासवून त्यांनी विश्वास संपादन केला. यानंतर आरोपींनी गृहिणीकडून ऑनलाईन पद्धतीने ३.१० लाख रुपये ट्रान्सफर करून घेतले.

दरम्यान, काही दिवसांनी महावितरणकडून अधिकृत नोटीस प्राप्त झाल्यानंतर गृहिणीला संशय आला. त्यानंतर झालेल्या पडताळणीत फसवणुकीचा प्रकार उघड झाला.

या प्रकरणी खडकपाडा पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon