मेट्रोमोनियल वेबसाईटवर इस्रोचा सायंटिस्ट म्हणून घटस्फोटीत महिलांची फसवणूक करणाऱ्या तोतया सायंटिस्टचा पर्दाफाश; येरवडा पोलिसांकडून आरोपीला अटक

मेट्रोमोनियल वेबसाईटवर इस्रोचा सायंटिस्ट म्हणून घटस्फोटीत महिलांची फसवणूक करणाऱ्या तोतया सायंटिस्टचा पर्दाफाश; येरवडा पोलिसांकडून आरोपीला अटक

योगेश पांडे / वार्ताहर 

पुणे – पुण्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मेट्रोमोनियल वेबसाईटवर फेक प्रोफाइल अकाउंट बनवून महिलांची फसवणूक करणाऱ्या तोतया इस्त्रो सायंटिस्टचा पर्दाफाश झाला आहे. आरोपीने मेट्रोमोनियल प्लॅटफॉर्मवर इस्त्रोमध्ये सायंटिस्ट असल्याचं फेक प्रोफाइल अकाउंट बनवून लग्नासाठी मागणी घातली होती. मुलीच्या शिक्षणाचा सगळा खर्च उचलणार असे सांगून आरोपीने तक्रारदाराच्या कुटुंबाचा विश्वास संपादन केला.

त्यानंतर त्यांना लोन घेण्यास भाग पाडून एकूण २६ लाख ५० हजार रुपयांची ऑनलाईन आर्थिक फसवणूक केली. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून येरवडा पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. आदर्श प्रशांत म्हात्रे असं अटक केलेल्या आरोपीचं नाव आहे.मिळालेल्या माहितीनुसार, येरवडा पोलिसांकडून या तोतया सायंटिस्टला बेड्या ठोकण्यात आल्या.

धक्कादायक बाब म्हणजे या आरोपीवर मुंबई,नवी मुंबई,ठाणे आणि पुणे येथे फसवणुकीचे बारा गुन्हे दाखल आहेत. घटस्फोटीत महिलेला मी इस्रोचा सायंटिस्ट आहे असं आरोपीने सांगितलं. या घटस्फोटीत महिलेला एक लहान मुलगी आहे. या मुलीचा शिक्षणाचा सगळा खर्च करतो असं देखील या तोतया सायंटिस्टन सांगून या महिलेचा विश्वास संपादन करून आर्थिक फसवणूक केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon