ठाण्यात विद्यार्थ्यांसाठी सुरक्षा जनजागृती; कासारवडवली पोलिसांचा उपक्रम

ठाण्यात विद्यार्थ्यांसाठी सुरक्षा जनजागृती; कासारवडवली पोलिसांचा उपक्रम

पोलीस महानगर नेटवर्क

ठाणे : विद्यार्थ्यांमध्ये सुरक्षिततेबाबत जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने कासारवडवली पोलिसांकडून न्यू व्होरायझन स्कूल, ठाणे येथे विशेष जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना गुड टच–बॅड टच याविषयी सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. तसेच वाढत्या सायबर गुन्ह्यांपासून कसे सावध राहावे, सोशल मीडियाचा सुरक्षित वापर कसा करावा याबाबतही माहिती देण्यात आली. महिला सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक खबरदारी आणि स्वसंरक्षणाबाबतही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.

यावेळी आपत्कालीन परिस्थितीत वापरायचे महत्त्वाचे क्रमांक 112 आणि 1098 यांची माहिती देत, कोणत्याही अडचणीच्या वेळी तत्काळ मदत कशी मिळवावी याबाबत विद्यार्थ्यांना सांगण्यात आले.

या उपक्रमास सुमारे १५० ते २०० विद्यार्थी तसेच शिक्षकवर्ग उपस्थित होता. विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत विविध प्रश्न विचारले, ज्यांची समाधानकारक उत्तरे पोलिसांनी दिली.

विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण सुरक्षिततेसाठी असे उपक्रम पुढेही राबविण्यात येणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon