पंढरपुरात तरुणीवर ॲसिड हल्ला, हल्लेखोर फरार; पीडित मातेची भावनिक साद, पोलिसांकडून शोध सुरू

Spread the love

पंढरपुरात तरुणीवर ॲसिड हल्ला, हल्लेखोर फरार; पीडित मातेची भावनिक साद, पोलिसांकडून शोध सुरू

योगेश पांडे / वार्ताहर

सोलापूर – राज्यातील महिलांवरील अत्याचाराच्या घटना काही कमी होताना दिसून येत नाही, एकीकडे अशोक खरात प्रकरणामुळे संताप असतानाच दुसरीडे अहिल्यानगरमध्ये असिड हल्ला प्रकरणही समोर आले होते. अहिल्यानगर जिल्ह्यातील शिर्डी तालुक्यात घडलेल्या असिड हल्ल्यातील आरोपीला अटक करण्यात अद्याप पोलिसांना यश आले नाही, त्यातच पंढरपुरात आणखी एका मुलीवर असिड हल्ल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी, पीडित मुलीला शहरातील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलंय.

पंढरपुरात रविवारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दौरा असताना दुसरीकडे शहरात धक्कादायक घटना घडल्याने खळबळ उडाली आहे. पंढरपूर शहरांमध्ये एका तरुणीवर ॲसिड हल्ला करण्यात आल्याने संताप व्यक्त होत आहे. वैष्णवी भागवत असे या पीडित तरुणीचे नाव असून अज्ञात इसमाने तिच्या अंगावर ॲसिड टाकल्याची प्राथमिक माहिती मिळाली असून तिला उपचारासाठी पंढरपूर शहरातील लाईफलाईन या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, पोलिसांनी या प्रकारात अज्ञात तरुणाचा शोध सुरू केला असून या परिसरातील सीसीटीव्ही चेक करण्यास सुरुवात केली आहे. मात्र, या प्रकाराने परिसरात दहशत निर्माण झाली आहे.

मुलीचे नातेवाईकही रुग्णालयात दाखल झाले असून आम्हाला एक फोन आला होता, तेव्हा आम्ही पेट्रोल पंपाजवळ पोहोचलो. इथं माझ्या मुलीवर ॲसिडसारखा पदार्थ टाकल्याचं समजलं. माझ्या मुलीवर टाकला तसा कुणावरही ॲसिड टाकू नका, असं भावनिक आवाहन पीडित मुलीच्या आईने केलं आहे. याप्रकरणी, गुन्हा नोंद करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon