भाजप स्थापना दिनानिमित्त देशभर कार्यक्रम; सायन-कोळीवाड्यात भव्य बाईक रॅली
सुधाकर नाडार / प्रतिनिधी

मुंबई : भारतीय जनता पार्टी चा ४७ वा स्थापना दिन रविवारी देशभर उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून “नेशन फर्स्ट”चा संदेश देण्यात आला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा व जे.पी.नड्डा यांच्यासह वरिष्ठ नेत्यांनी पक्षध्वज फडकावत कार्यकर्त्यांना संबोधित केले.
मुंबईतील सायन-कोळीवाडा विधानसभा मतदारसंघात आमदार कॅप्टन आर तमिल सेलवन यांच्या नेतृत्वाखाली भव्य बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले. दयाशंकर चौक, दिबंधू नगर येथून रॅलीची सुरुवात झाली.
गणेश नगर, बरकत अली नगर, अँटॉप हिल, कल्पक इस्टेट, सुंदर लिंगम चौक, जीटीबी ब्रिज, सायन सर्कल, सायन तलाव, किंग सर्कल, महेश्वरी उद्यान आणि माटुंगा स्टेशन रोड मार्गे निप्पो उद्यान येथे रॅलीचा समारोप करण्यात आला.
या रॅलीत मोठ्या संख्येने पक्ष पदाधिकारी, कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक सहभागी झाले होते. “विकसित भारत” आणि “अंत्योदय” या संकल्पनांचा पुनरुच्चार करत सामाजिक बांधिलकी अधोरेखित करण्यात आली.