ठाणे जेलमध्ये कैद्याने पोलीसाच्याच लगावली कानशिलात; जीवे मारण्याची ही दिली धमकी

Spread the love

ठाणे जेलमध्ये कैद्याने पोलीसाच्याच लगावली कानशिलात; जीवे मारण्याची ही दिली धमकी

योगेश पांडे / वार्ताहर

ठाणे – पोलीस हे सर्व सामान्यांचे रक्षण करत असतात. समाजातील गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांवर वचक बसवतात. पण त्याच पोलीसांना चक्क जेलमध्येच मारहाण होत आहे. त्यामुळे सर्व सामान्यांचे सोडा पोलीसांच्याच सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. ही घटना ठाणे कारागृहात घडल्याचे समोर आले आहे. इथं एका कैद्याने चक्क पोलीसाच्याच कानशिलात लगावली. तो ऐवढ्यावरच थांबला नाही. तर त्याने त्या पोलीसाला जिव ठार मारण्याची धमकी ही तिथेच दिली. या घटनेमुळे कारागृह प्रशासनात एकच खळबळ उडाली आहे.

आरोपी फ्रँक कन्नाथ एझी याला मुंबईच्या सेशन्स कोर्टात नेण्यात आले होते. तिथून त्याला पुन्हा ठाणे कारागृहात आणले जात होते. त्याच वेळी ठाणे कारागृहा बाहेर अविनाश अशोक जाधव हा कैदी होता. तिथे त्याला भेटण्यासाठी त्याचा भाऊ आला होता. त्याचा भाऊ कैदी अविनाशला काही तरी खायला देत होता. त्यावेळी तिथे कर्तव्यावर असलेल्या पोलीस अंमलदाराने ते पाहीले. त्यांनी लगेचच त्या कैदी आणि त्याचा भावाला अडवले. शिवाय असे बाहेरचे खाण्यासाठी देता येणार नाही असे सांगितले.

अंमलदाराने त्यावेळी कैद्याच्या भावाला तिथून दुर केले. याचा राग कैदी अविनाश अशोक जाधव यांने मनात धरला. या रागातून त्याने अंमलदार पोलीस कर्मचाऱ्याच्या कानशिलात लगावली. त्यावरच तो थांबला नाही. त्याने त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली. माझ्या भावाला मारतोस का? जेलमधून सुटल्यानंतर तुला बघतो. तुला ठोकतो अशी धमकी ही तो देत होता. अविनाश जाधव हा आरोपी सध्या ठाणे कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत आहे. या घटनेनंतर एकच खळबळ उडाली आहे.

ही घटना घडल्यानंतर संबंधीत पोलीस कर्मचाऱ्याने कैदी अविनाश जाधव याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. याचा पुढील तपास ठाणेनगर पोलीस ठाणे करीत आहे. जेलमध्येच ही घटना घडल्याने पोलीसांच्याच सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. या घटनेनंतर जेल प्रशासन ही अलर्ट मोडवर आलं आहे. अशा घटना पुन्हा होवू नयेत यासाठी काळजी घेतली जात आहे. तर दुसरीकडे या घटनेची चर्चा शहरात चांगलीच रंगली आहे. सर्वां समोर झालेल्या या घटनेनं पोलीस ही हादरले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon