कल्याण-शहाड पुलावर भीषण अपघात, दुचाकीला टेम्पोची जोराची धडक; डॉक्टरचा जागीच मृत्यू
योगेश पांडे / वार्ताहर
कल्याण – कल्याण-शहाड पुलावर भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. यामध्ये एका डॉक्टरचा जागीच मृत्यू झाला आहे, या प्रकरणी टेम्पो चालकाला अटक केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, डॉक्टर दुचाकीवर जात असताना अचानक त्यांनी एका टॅम्पोनं धडक दिली आहे. हा भीषण अपघात झाला आहे. डॉक्टर सोमनाथ पाटील असं त्यांचं नाव आहे.
डॉक्टर सोमनाथ पाटील हे आपल्या दुचाकीवरून प्रवास करत असताना एका आयशर टेम्पोने त्यांना जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, डॉक्टर पाटील यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. अपघातानंतर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत तपास सुरु केला आहे. या प्रकरणी टेम्पो चालक बॉबी चंदन जुनी याला अटक करण्यात आले असून त्याला कल्याण न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने त्याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.