मुंबईतील चर्चित लालबाग ‘मिर्ची गल्ली’वर पालिकेचा हातोडा; २ दिवसांत रस्ते मोकळे
योगेश पांडे / वार्ताहर
मुंबई – लालबागमधील ‘मिर्ची गल्ली’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भागात पालिकेने अतिक्रमणांवर कारवाई करत पादचारी मार्ग मोकळा केला.मिर्ची गल्लीतील बहुतांश दुकानांनी अनेक वर्षांपासून आपल्या दुकानांच्या पुढे जवळपास १०-१५ फूट जागा सार्वजनिक चालण्याच्या जागेत घुसवून, पादचाऱ्यांची चालण्याची जागा अक्षरशः गिळंकृत केली होती.
मसाल्यांच्या दुकानांसमोर लाल मिरचीचे ढिग लावून मोठ्या प्रमाणात अतिक्रमण करण्यात आले होते.दोन दिवस चाललेल्या मोहिमेत वाढीव शेड्स, स्टॉल्स आणि बाहेर ठेवलेला माल जप्त करण्यात आला.पादचाऱ्यांना चालण्यासाठी जागा उपलब्ध झाली असून वाहतूक कोंडीही कमी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. स्थानिकांच्या तक्रारीनंतर ही कारवाई करण्यात आली.