‘सिया के राम’मधील हनुमान दानिश अख्तर; प्रत्यक्ष आयुष्यातही श्रद्धा आणि साधनेचा संगम

Spread the love

‘सिया के राम’मधील हनुमान दानिश अख्तर; प्रत्यक्ष आयुष्यातही श्रद्धा आणि साधनेचा संगम

सुधाकर नाडार / प्रतिनिधी

मुंबई : सिया के राम या लोकप्रिय मालिकेत हनुमानजींची प्रभावी भूमिका साकारणारे दानिश अख्तर हे प्रत्यक्ष आयुष्यातही भगवान श्रीराम आणि हनुमानजींचे निष्ठावान भक्त असल्याचे समोर आले आहे. हनुमान जयंतीनिमित्त त्यांच्या या आध्यात्मिक बाजूची विशेष चर्चा रंगली आहे.

हनुमानाची भूमिका साकारण्यासाठी दानिश यांनी केवळ ‘हनुमान चालीसा’ पाठ केली नाही, तर हनुमानजींवरील विविध धार्मिक ग्रंथांचाही सखोल अभ्यास केला. भूमिकेत वास्तवता आणण्यासाठी त्यांनी केलेली ही मेहनत प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली.

बिहारमधील मुस्लिम बहुल परिसरातून आलेल्या दानिश यांची कारकीर्दही तितकीच वेगळी आहे. अभिनय क्षेत्रात येण्यापूर्वी ते कुस्तीपटू होते आणि द ग्रेट खली यांचे शिष्य राहिले आहेत. त्यांनी वर्ल्ड रेसलिंग एंटरटेनमेंट (WWE) मध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न केला होता; मात्र व्हिसासंबंधी अडचणींमुळे त्यांना ही संधी गमवावी लागली.

धार्मिक आणि पौराणिक भूमिकांमधून ओळख निर्माण केलेल्या दानिश यांनी परशुराम, नंदी आणि भीम यांसारख्या व्यक्तिरेखाही साकारल्या आहेत. “कोणताही धर्म द्वेष शिकवत नाही; तो मानवता आणि माणुसकीचाच संदेश देतो,” असे त्यांचे मत आहे.

दरम्यान, हनुमान जयंतीच्या पवित्र निमित्ताने त्यांनी सर्वांना शुभेच्छा देत भक्ती, श्रद्धा आणि ऐक्याचा संदेश दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon