एक फुल दोन माळी! एका मुलीवरून दोन तरुण भिडले; मुंबईत भर रेल्वे रुळावर फ्री स्टाईल हाणामारी

Spread the love

एक फुल दोन माळी! एका मुलीवरून दोन तरुण भिडले; मुंबईत भर रेल्वे रुळावर फ्री स्टाईल हाणामारी

योगेश पांडे / वार्ताहर

मुंबई – मध्य रेल्वेच्या मुलुंड रेल्वे स्थानकाच्या रुळांवर फ्री स्टाईल हाणामारी झाल्याची घटना घडली आहे.एक फुल दोन माळी, मुलीवरून दोन्ही तरुण भिडले असल्याची माहिती समोर आली आहे.दोन तरुण यांची मारामारी प्रवासी कॅमेरात कैद झाली आहे.

सदर व्हिडीओ मुलुंड स्थानकाचा असल्याचं बोलल जात असून सध्या व्हायरल होत आहे.प्रवाश्यांकडून ट्रेन येत असल्याचं सांगत असताना सुद्धा मारामारी सुरू झाली.प्रवाशाने ट्रेन आल्यावर दोन्ही तरुणांना बाजूला करून सोडविण्याचा प्रयत्न केला.मात्र रेल्वे सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे, यावेळी घटना स्थळी पोलिस नसल्याचं चित्र दिसून आलं.

या व्हायरल व्हिडिओची रेल्वे पोलिस तपास करून काय कारवाई करता याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.या घटनेमुळे प्रवाशांच्या जीविताला धोका निर्माण झाल्याने स्थानकांवरील सुरक्षाव्यवस्थेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon