रामनवमीला शोभायात्रा रोखल्याचा पोलिसांवर आरोप, सकल हिंदू समाजाचं चेंबूरमध्ये आंदोलन; पोलिसांकडून आंदोलक ताब्यात
योगेश पांडे / वार्ताहर
मुंबई – मुंबईतील चेंबूर येथील माहूल रोड येथे सकल हिंदू समाजाच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं. यावेळी आंदोलकांनी आक्रमक भूमिका घेत माहूल रोड ठप्प केला होता. आंदोलकांनी अप्पर पोलीस आयुक्त महेश पाटील यांच्याविरोधात आंदोलन करण्यात आलं होतं. माहूल रोडला छावणीचं रुप आल्याचं पाहायला मिळालं होतं. मुंबई पोलीस, राज्य राखीव पोलीस दल, होमगार्ड मोठ्या प्रमाणात तैनात करण्यात आले होते. पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतलं , याचवेळी साधू संत आणि जैन मुनींना देखील ताब्यात घेण्यात आलं. माहूल रोडवरील एक मार्गिका पोलिसांनी बंद केली होती. पोलीस उपायुक्त समीर शेख घटनास्थळी दाखल झाले होते.
सकल हिंदू समाजानं केलेल्या आंदोलनाचं कारण रामनवमीच्या दिवशी शोभा यात्रा कायदा व सुव्यवस्थेचं कारण देत नमाज सुरु असताना रोखल्या गेल्या होत्या, हे आहे. यावेळी पोलिसांनी उद्धट उत्तर दिल्याचा आरोप सकल हिंदू समाजानं केला होता. सकल हिंदू समाजानं या प्रकरणी पोलिसावर कारवाई करण्याची मागणी केली होती. मंगळवारी मुंबईत या प्रकरणी अप्पर पोलीस आयुक्त पूर्व विभाग येथे आंदोलन करु असं सांगण्यात आलं होतं. त्यानुसार मंगळवारी आंदोलक जमले होते. पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतल्याचं देखील पाहायला मिळालं.
राम नवमी च्या दिवशी विक्रोळी पार्कसाईट आणि घाटकोपर येथे राम नवमी च्या शोभा यात्रा नमाज सुरू असल्याचं सांगत कायदा व सुव्यस्थेचं कारण देऊन पोलिसानी रोखल्या होत्या होत्या. या बाबत सकल हिंदू समाजाने अप्पर पोलीस आयुक्त महेश पाटील यांनी उद्धट उत्तरे दिल्याचा आरोप केला होता. याच मुद्यावर हिंदू समाजाच्यावतीने मंगळवारी आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते.अप्पर पोलिस आयुक्त पूर्व विभाग येथे हे आंदोलन होणार होते.पाटील यांच्या निलंबनाची मागणी सकल हिंदू समाजाची आहे.मात्र, आंदोलक जमा होताच पोलिसानी त्यांना ताब्यात घेतले, या मूळ आंदोलक आक्रमक झाले आणि पोलीस वाहनांच्या समोर झोपले. तर, काही आंदोलकांनी पोलीस कारवाई वेळी घोषणाबाजी करण्याचा प्रयत्न केला.
आंदोलकांमध्ये काही साधू आणि जैन मुनी देखील सहभागी झाल्याचं पाहायला मिळालं होतं. पोलिसांनी सुरुवातीला त्यांचं म्हणनं ऐकून घेतलं आणि त्यानंतर त्यांना ताब्यात घेण्याची कारवाई केली.