खरात प्रकरणात मोठी अपडेट!

Spread the love

खरात प्रकरणात मोठी अपडेट!

पोलीसांनी जप्त केले तब्बल २७६ व्हिडीओ; पीडित महिलांची ओळख पटवण्याचे काम सुरु

योगेश पांडे / वार्ताहर

नाशिक – महिलांचे लैंगिक शोषण केल्याप्रकरणी भोंदूबाबा अशोक खरात याच्यावर आता ८ गुन्हे दाखल करण्यात आले असून विशेष तपास पथक अर्थात एसआयटी मार्फत या प्रकरणांचा सखोल तपास केला जात आहे. एसआयटी पथकाच्या तपासात अनेक बाबी उघड झाल्या आहेत. अनेक महिलांचे अशोक खरात याने लैंगिक शोषण केले असल्याचे व्हिडिओ देखील पोलिसांच्या हाती लागले असून त्या दिशेने देखील तपास सुरू आहे. यातच आता तपास यंत्रणांच्या हाती तब्बल २७६ आक्षेपार्ह व्हिडिओ लागले आल्याची माहिती पुढे येत आहे. यामुळे संपूर्ण राज्यभरात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, या व्हिडिओंमध्ये अल्पवयीन मुली, युवती आणि प्रौढ महिलांचे चित्रीकरण करण्यात आले असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तर आता या रॅकेटमध्ये केवळ अशोक खरात हा एकटा नसून अनेक बड्या अधिकाऱ्यांचा देखील सहभाग यात असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे तपासादरम्यान मिळालेल्या पुराव्यांमुळे अनेक बड्या व्यक्तींचे चेहरे देखील उघड होण्याची चिन्हे दिसून येत आहेत.

विशेष तपास पथकाच्या मार्फत आता या प्रकरणाचा अतिशय कसून आणि गुप्त पद्धतीने तपास सुरू आहे. सदर प्रकरणाचे गांभीर्य आणि पीडितांच्या सुरक्षेचा मुद्दा लक्षात घेता एसआयटी ने अत्यंत सावध पाऊल उचललं आहे. या प्रकरणातील पीडित महिलांवर कोणताही दबाव येऊ नये आणि त्यांची ओळख गोपनीय रहावी यासाठी त्यांचे जबाब अज्ञात स्थळी नोंदवले जाणार आहे. या व्हिडिओच्या माध्यमातून आता पीडितांची ओळख पटवण्याचे काम सुरू असून लवकरच रॅकेटमधील अन्य संशयितांना बेड्या ठोकल्या जातील, असा विश्वास पोलीस प्रशासनाकडून व्यक्त केला जात आहे.

दरम्यान, या पार्श्वभूमीवर आता भोंदूबाब अशोक खरात याच्या संपूर्ण प्रकरणामध्ये कुठल्या बड्या अधिकाऱ्यांचा समावेश होता? त्या मागचे नेमके कारण काय? याबाबत पोलिसांकडून सखोल तपास होणार आहेत. त्यामुळे आणखी काय काय धक्कादायक बाबी समोर येतात, हे बघणे महत्त्वाचे असणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon