एकविरा देवी यात्रेत दगडफेक; दोन गटांत तणाव, काहीजण जखमी

एकविरा देवी यात्रेत दगडफेक; दोन गटांत तणाव, काहीजण जखमी

योगेश पांडे / वार्ताहर

पुणे : कार्ला येथील एकविरा देवीच्या चैत्री यात्रेदरम्यान दोन गटांमध्ये झालेल्या वादातून दगडफेक होऊन तणाव निर्माण झाला. या घटनेत काही भाविक जखमी झाले असून परिसरात काही काळ गोंधळाचे वातावरण होते.

मुख्य यात्रा संपल्यानंतर गड उतरताना कल्याण आणि पनवेल येथील भाविकांमध्ये वाद झाला. किरकोळ कारणावरून सुरू झालेला वाद गुरुवारी चिघळत दगडफेकीपर्यंत पोहोचला. अचानक झालेल्या प्रकारामुळे भाविकांमध्ये पळापळ उडाली.

घटनेची माहिती मिळताच लोणावळा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. काही जणांना ताब्यात घेण्यात आले असून जखमींवर उपचार सुरू आहेत. परिसरात कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon