रामनवमी मिरवणुकीत नालासोपाऱ्यात तणाव; पोलीस-भाविकांमध्ये झटापट

रामनवमी मिरवणुकीत नालासोपाऱ्यात तणाव; पोलीस-भाविकांमध्ये झटापट

योगेश पांडे / वार्ताहर

नालासोपारा : रामनवमी निमित्त काढण्यात आलेल्या शोभायात्रेदरम्यान नालासोपाऱ्यात पोलीस आणि आयोजकांमध्ये वाद होऊन तणावाचे वातावरण निर्माण झाले. मार्गाबाबत झालेल्या वादातून बाचाबाची वाढत धक्काबुक्कीपर्यंत प्रकरण गेले.

ओसवाल नगरी सर्कल येथून निघालेली मिरवणूक रहमत नगरकडे जात असताना पोलिसांनी एका गल्लीतून जाण्यास आक्षेप घेतल्याने वाद निर्माण झाला. परिस्थिती नियंत्रणाबाहेर जात असल्याने पोलिसांनी लाठीचार्ज केल्याचा आरोप भाविकांनी केला आहे.

या घटनेनंतर संतप्त भाविकांनी रस्त्यावर ठिय्या आंदोलन करत घोषणाबाजी केली, त्यामुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली. दरम्यान, अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून परिस्थिती नियंत्रणात असल्याचा दावा प्रशासनाने केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon